Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशीतील दुर्घटनाग्रस्त ‘गीता अपार्टमेंट’ अखेर जमीनदोस्त; नमुंमपाची मोठी कारवाई, सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद

नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी येथील जुहू गावातील अतिधोकादायक 'गीता अपार्टमेंट' ही इमारत मंगळवारी जमीनदोस्त केली. सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद ठेवण्यात आला होता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 07, 2026 | 09:06 PM
वाशीतील दुर्घटनाग्रस्त 'गीता अपार्टमेंट' अखेर जमीनदोस्त

वाशीतील दुर्घटनाग्रस्त 'गीता अपार्टमेंट' अखेर जमीनदोस्त

Follow Us
Follow Us:
  • वाशीतील दुर्घटनाग्रस्त ‘गीता अपार्टमेंट’ अखेर जमीनदोस्त
  • नमुंमपाची मोठी कारवाई
  • सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद
सावन वैश्य | नवी मुंबई : वाशी येथील जुहू गावातील दुर्घटनाग्रस्त आणि अतिधोकादायक घोषित करण्यात आलेले गीता अपार्टमेंट अखेर नवी मुंबई महानगरपालिकेकडून मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आले. जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. इमारत मुख्य रस्त्यालगत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी गीता अपार्टमेंटचा सज्जा अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत या धोकादायक इमारतीत असलेल्या दुकानात आलेल्या ग्राहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. महापालिकेने यापूर्वीच ही इमारत अतिधोकादायक घोषित करून रहिवाशांचे स्थलांतर केले होते. मात्र, तळमजल्यावरील काही दुकाने सुरू असल्याने दुर्घटनेच्या वेळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाला जीव गमवावा लागला.

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार

दुर्घटनेनंतर महापालिकेने तातडीने इमारत पूर्णपणे रिकामी करून पाडकामाचा निर्णय घेतला. कारवाईदरम्यान धूळ उडू नये आणि परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण इमारतीला हिरव्या संरक्षक जाळ्यांनी (ग्रीन नेट) वेढण्यात आले होते. तसेच परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या.

नवी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, अभियांत्रिकी विभाग, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही कारवाई शांततेत आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आली. पाडकामानंतर रस्त्यावरील राडारोडा हटवून वाशी-कोपरखैरणे मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

धोकादायक ठरलेल्या गीता अपार्टमेंटचे अखेर पाडकाम झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, अशा धोकादायक इमारतींवर वेळेत कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू

Web Title: Navi mumbai nmmc demolished dangerous gita apartment in vashi juhu gaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • building collapse
  • Navi Mumbai
  • Vashi

संबंधित बातम्या

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार
1

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू
2

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत
3

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा
4

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.