काय घडलं नेमकं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर १० परिसरातून जात असताना अचानक कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटलेली ही सुसाट कार रस्त्यावरून जाणाऱ्या आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर गेली. वेग जास्त असल्याने कारने तब्बल ८ ते १० जणांना हवेत उडवलं. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींवर उपचार सुरू
स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
चालक फरार
अपघातानंतर कारचालक गाडी सोडून घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू
प्रशासनाने वारंवार इशारे दिले, धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली, तरीही काही जणांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले… आणि काही क्षणांतच आनंदाची सहल भीषण दुर्घटनेत बदलली. खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यालाही अडथळे येत असून, दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.
तळोजा फेज 1 सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद हा राहत होता. त्याचे वय वीस वर्षे होते. हा तरूण पांडवकडा परिसरात पाण्याच्या प्रवाहात बुडाला आहे. तर दुसरा तरुणा हा मुंबईतल्या सांताक्रुझचा आहे. त्याचे वय 19 वर्ष आहे. शेण्णोन गॅस्पर किनी असं या तरुणाचं नाव आहे. तो ही धबधब्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे.
Ans: नवी मुंबईतील तळोजा सेक्टर-10 येथे हा भीषण अपघात घडला.
Ans: या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.
Ans: अपघातानंतर चालक कार घटनास्थळी सोडून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.






