Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : गृहिणींना दिलासा, बाजारात लसूणच्या किंमतीत घट; काय आहेत नवीन दर ?

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या लसणाच्या दरात घट झाली असून सर्वसामान्य नागरिक याबाबत समाधान व्यक्त करत आहेत. लसूणचे नवे दर काय आहे किती रुपयांनी घट झाली आहे हे जाणून घ्या..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 08, 2025 | 12:09 PM
गृहिणींना दिलासा , बाजारात लसूणाच्या किंमतीत घट; काय आहेत नवीन दर ?

गृहिणींना दिलासा , बाजारात लसूणाच्या किंमतीत घट; काय आहेत नवीन दर ?

Follow Us
Follow Us:

नवी मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क:  गेल्या काही दिवसांपासून लसणाची फोडणी प्रचंड महागली होती. परंतु, मार्केटमध्ये लसणाची आवक वाढल्यामुळे आता भाव निम्म्यावर आले आहेत. किरकोळ बाजारात400 रुपये किलोने असलेल्या लसणाच्या किंमतीत घट झाली असून 100 ते 200 रुपयांनी लसूण स्वस्त झाला आहे. त्यामुळे गृहिणींना याबाबात दिलासा मिळाला आहे. सध्या लसणाच्या दरात घट झाल्याने बाजारात घाऊक किंमतीने 50 ते 120 रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

लसणाचे सर्वसाधारण दर हे 50 ते100 आणि100 ते150 रुपये किलो असेच असतात. मात्र तीन वर्षा पूर्वीपासून हे दर सातत्याने वाढत होते. मुळात लसणाची लागवड कमी झाल्याने उत्पादन कमी यायला सुरुवात झाली. मात्र बाजारात लसणाला मोठी मागणी असल्याने मागणी इतका पुरवठा बाजारात होत नव्हता. त्यामुळे मागणी पुरवठ्याचे गणित बिघडले आणि लसणाचे दर वाढायला सुरुवात झाली. 200 रुपये किलोपासून हे दर वाढत वाढत400 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे लसणाची फोडणी देणे सर्वसामान्यांना परवडत नव्हते. या वाढत जाणाऱ्या दरामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत होती.

MSRTC News Update: नाट्यमय घडामोडींनंतर MSRTCचे अध्यक्षपद पुन्हा प्रताप सरनाईकांकडे; फडणवीस-शिंदेंमधील दुरावा कमी

याचपार्श्वभूमीवर फेब्रुवारीपासून बाजारात नव्या लसणाची आवक सुरू झाली आहे. लसणाला चांगला दर मिळत असल्याने गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसणाची लागवड केली. त्यामुळे आता बाजारात चांगला लसूण येत आहे. लसणाची मोठी आवक मध्य प्रदेश इंदोर मधन होत आहे.
बाजारात मोठ्या प्रमाणात लसूण उपलब्ध • बाजारात मोठ्या चांगलीच राहणार आहे. आवक चांगली राहणार असल्याने दर ही स्थिर राहणार आहेत. यावर्षी लसणाच्या दरात वाढ होणार नाही असेच चित्र सध्या बाजारात आहे. मे महिन्या पर्यंत दर असेच स्थिर राहिले जातील. त्यानंतर लसनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

Santosh Deshmukh case: ‘मी संतोष देशमुखांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता..’; गोपनीय साक्षीदारांनी जबाबात सगळंच सांगितलं

दिगंबर राऊत, घाऊक व्यापारी, एपीएमसी बाजारपेठ

बाजारात चायना लसूणही मोठ्या प्रमाणात बाजारात चायना लसूणही मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यामुळे आता बाजारात मागणी पेक्षाही दुप्पट लसूण उपलब्ध आहे आणि त्यामुळेच लसणाचे दर खाली आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात लसूण घाऊक बाजारात 30 ते 60किलो होता. मात्र मार्च महिन्यात थोडा दर वाढला असून, चांगल्या प्रतीचा लसूण 120 तर आकाराने लहान व ओला लसूण 50 रुपये किलो झाला आहे. तर टेम्पोमधून ठिकठिकाणी विक्री होणारा लसूण 100रुपयाला दीड किलो मिळत आहे.

Web Title: Navi mumbai relief for housewives garlic prices drop in the market what are the new prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • APMC Market
  • Navi Mumbai
  • Vashi

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
1

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी
2

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.