Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local : दोन लोकल आजूबाजूने धावत होत्या, प्रवाशांचा बॅग घासल्या अन् …; लोकल प्रवासी अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Tragedy on Central Railway: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून गाडीतून 8 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2025 | 11:35 AM
लोकल प्रवासी अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)

लोकल प्रवासी अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Tragedy on Central Railway News in Marathi : मध्य रेल्वेवरील दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी पडल्याची घटना समोर आली. जलद लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी रेल्वे रुळावर पडले. या अपघातामध्ये आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन प्रवास गंभीर जखमी अवस्थेत आहेत, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. तसेच या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 6 जणांचा मृत्यू, दोन गंभीर

सोमवारी (9 जून) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर विरुद्ध दिशेची लोकल आणि समोरुन येणाऱ्या लोकल गर्दीमुळे अनेक धावत्या लोकलमधून पडून खाली पडले. पिक अवरची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून दोन जखमी आहेत.

रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून पडले . अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही 8 लोकं खाली पडलीत. रेल्वेने उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचे नियोजन केले आहेत. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत. प्रवासी दरवाज्याच्या फूट बोर्डवर होते म्हणून हा अपघात घडला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सीपीआरओकडून देण्यात आली. या अपघातानंतर नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असतील. म्हणजेच ऑटोमेटीक डोअर क्लोजर सिस्टीमच्या नवीन गाड्यामध्ये बसविण्यात येणार आहे, असा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.

ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती

लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातामुळे लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाला आहे, ज्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

अपघात कसा झाला

मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील धनराज नीला म्हणाले की, मुंब्राहून दिवाला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे आठ जण खाली पडले. कसाराला जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गार्डने घटनेची माहिती दिली. या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही घटना मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान डाउन/फास्ट लाईनवर घडली. कसाराहून येणाऱ्या लोकल ट्रेनच्या फूटबोर्डवर आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणारे लोक एकमेकांवर आदळले आणि खाली पडले.

Pune Mumbai Expressway :  मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे १० पदरी होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Web Title: New local trains with an automatic door closing system will be coming a decision by the railway administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Accident
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
4

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.