Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: भयंकर, भीषण चक्रीवादळ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस अक्षरश:…

Maharashtra Rain Alert: सोमवारी शहरात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तापमानातील घसरण आणि दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणवत होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 02, 2026 | 09:17 PM
maharashtra rain alert

maharashtra rain alert

Follow Us
Follow Us:
  • चक्रीय स्थितीमुळे पुण्यात पावसाची हजेरी
  • पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
  • हवामान विभागाकडून येलो अलर्ट
Maharashtra Rain Alert/सुनयना सोनवणे: बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ मुरासू आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पुण्यासह राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शहर आणि परिसरात सोमवारी (ता. २) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात आठ ते नऊ अंश सेल्सिअसने घट झाली. सकाळी शहराच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली, तर दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी शहरात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तापमानातील घसरण आणि दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणवत होता. मंगळवारी कमाल तापमान २६ अंश, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सावधान! पुढील 4 तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, शाळा बंद आणि रेल्वे गाड्या रद्द; ‘cyclone arnab’ चा धोका वाढला

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर तीव्र चक्रीवादळ मुरासू केंद्रित असून, ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत समुद्रसपाटीपासून ०.९ किलोमीटर उंचीवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय पाच ते दहा किलोमीटर उंचीवरील उपोष्णकटिबंधीय पश्चिमी जेट प्रवाह दक्षिणेकडे सरकल्याने वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाली आहे. या हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस पावसाचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील पावसाची नोंद

ठिकाण  – पाऊस (मिमी)

ढमढेरे –  ४३.०
मगरपट्टा –  १६.०
हवेली – १३.०
चिंचवड –  ११.५
शिवाजीनगर – १०.९
पाषाण – ७.८
एनडीए – ७.०
शिरूर – ७.०
आंबेगाव –  ६.०
बारामती –  ४.६
हडपसर – ४.०

खडकवासला धरणसाखळीत ८०.५२ टक्के पाणीसाठा –

खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून २३.४७ टीएमसी (८०.५२ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत २८.४० टीएमसी (९७.४१ टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टीएमसीने साठा कमी आहे. सोमवारी चारही धरणांमध्ये नव्याने पाण्याची आवक झालेली नाही.

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात

धरण – पाणीसाठा (टीएमसी)  – टक्केवारी 

खडकवासला – १.१२ – ५६.८२
पानशेत –  ८.२४ – ७७.२६
वरसगाव – १०.९५ –  ८५.४१
टेमघर – ३.१४ –  ८४.६३
एकूण – २३.४७ -८०.५२

(खडकवासला धरणातून आतापर्यंत स्पिलवेद्वारे १९.०५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्याला कोणता अलर्ट देण्यात आला आहे?

    Ans: पुणे शहराला पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • Que: खडकवासला धरणसाखळीत किती टक्के पाणीसाठा आहे?

    Ans: खडकवासला धरणसाखळीत ८०.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Web Title: Imd get heavy rain yellow alert next 2 days for pune city latest weather updates tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Weather
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Weather: कुठे मुसळधार, तर कुठे थेंबही नाही! महाराष्ट्रातील पावसाचे आकडे सांगतात भविष्यातील संकट
1

Maharashtra Weather: कुठे मुसळधार, तर कुठे थेंबही नाही! महाराष्ट्रातील पावसाचे आकडे सांगतात भविष्यातील संकट

देशातील 25 राज्यांना हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’; ओडिशा, आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा तडाखा
2

देशातील 25 राज्यांना हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’; ओडिशा, आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा तडाखा

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
3

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.