Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणात स्टार्टअप आणि नवोपक्रमांना आर्थिक पाठबळ, ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी; सरकारकडून 2.5 कोटींचा निधी

कोकणातील नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला मोठी चालना मिळणार असून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’साठी निवड झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2026 | 01:43 PM
कोकणात स्टार्टअप आणि नवोपक्रमांना आर्थिक पाठबळ, 'अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर'ला मंजुरी; सरकारकडून 2.5 कोटींचा निधी

कोकणात स्टार्टअप आणि नवोपक्रमांना आर्थिक पाठबळ, 'अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर'ला मंजुरी; सरकारकडून 2.5 कोटींचा निधी

Follow Us
Follow Us:
  • कोकणासाठी मोठी खुशखबर! 2.5 कोटींचे अनुदान, स्टार्टअप्सना मिळणार नवे बळ
  • कोकणात नवोपक्रमांना चालना; ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला 2.5 कोटींची मंजुरी
  • स्टार्टअप क्षेत्रासाठी मोठा निर्णय; कोकणात आर्थिक पाठबळासाठी 2.5 कोटी मंजूर
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची निवड भारत सरकारच्या नीती आयोगअंतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशन यांच्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ योजनेसाठी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २.५ कोटी रुपयांचे अनुदान नुकतेच मंजूर झाले आहे. ग्रामीण व निमशहरी भागात नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे कोकणातील युवक, शेतकरी, मत्स्य व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली स्टार्टअप परिसंस्था आता गावपातळीवर पोहोचविण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकण पट्टयाला स्वयंपूर्ण उद्योजक केंद्र म्हणून विकसित करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे.

Raigad News: गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरातील हा उपक्रम कोकणातील नवोपक्रम, कौशल्यविकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल. ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ हे कोकणातील युवकांसाठी स्वप्नांना उभारी देणारे व्यासपीठ ठरणार असून पुढील पाच वर्षात ६० पेक्षा अधिक स्टार्टअप्सना चालना देऊन हजारो रोजगारनिर्मितीचे लक्ष बाळगून कोकणाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. स्थानिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ‘आत्मनिर्भर कोकण’ घडविण्यास हा उपक्रम सहाय्यभूत ठरेल.- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ (फोटो सौजन्य – AI Created)

विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी प्रकल्प

स्थानिक पातळीवरील समस्या जसे फळप्रक्रिया कचरा, सागरी वाहतूक यांचे रूपांतर व्यावसायिक संधीमध्ये करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे ‘आत्मनिर्भर कोकण साकारण्यास चालना मिळेल, रत्नागिरी उपपरिसरात सुमारे ४,००० चौरस फूट जागेत अत्याधुनिक ‘फॅब लॅब ‘सह इन्क्युबेशन सुविधा उभारण्यात येणार आहेत. स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रोटोटायपिंग, तसेच निधी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. मुंबईतील तज्ज्ञ व उद्योग क्षेत्राशी बेट जोडणीही साधली जाणार आहे.

ईदच्या तोंडावर गॅसटंचाईची झळ, व्यावसायिक संकटात; ‘मास कम्युनिटी किचन’ची तयारी

१८० किमीपेक्षा अधिक किनारपट्टी असलेला

रत्नागिरी जिल्हा ‘ब्ल्यू इकॉनॉमी ‘साठी मोठी क्षमता बाळगत असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टियर-३ शहरात हा उपक्रम राबविणे म्हणजे शहरी-ग्रामीण नवोपक्रम दरी कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाला चालना देणारे पाऊल ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून समाजातील विविध घटकांना लाभ देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, महिला बचत गटांसाठी ब्रडिंग व मार्केटिंग सहाय्य, तसेच युवकांसाठी थ्रीडी प्रिंटर, लेझर कटर, सीएनसी यंत्रसामग्रीसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर उपलब्ध होणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ratnagiri campus of university of mumbai gets 25 rupees crore grant under atal innovation mission to boost konkan startups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
1

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
2

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
3

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
4

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.