Raigad News: गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त
भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, अनेक हॉटेलचालकांना आपला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली आहे. जे हॉटेल सुरू आहेत, त्याठिकाणी खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गॅसटंचाईमुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकही प्रभावित झाले आहेत. घरगुती वापरासाठी इलेक्ट्रिक शेगड्यांना मोठी मागणी निर्माण झाली असून, बाजारात त्यांची टंचाई भासू लागली आहे. परिणामी, काही विक्रेत्यांकडून या शेगड्या चढ्या दराने विकल्या जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या परिस्थितीमुळे हॉटेल चालक आणि गृहिणी दोघांनाही दुहेरी फटका बसत आहे. एकीकडे गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाक करणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे पर्यायी साधनांसाठीही जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल मालक विविध पर्यायांचा अवलंब करत आहेत. काही ठिकाणी पारंपरिक लाकडाच्या चुलींचा वापर पुन्हा सुरू करण्यात आला आहे, तर काहींनी इंडक्शन कुकर (इलेट्रिक शेगडी) वापरण्याचा मार्ग स्वीकारला आहे, मात्र या पर्यायांमध्येही अनेक अडचणी समोर येत आहेत.
दरम्यान, प्रशासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागू शकतो. त्यामुळे नागरिकानी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, जागतिक तेल आणि वायू संकट निर्माण झाले आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत, केंद्र सरकारने देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशात डाळींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, केंद्र सरकारने म्यानमारसोबतचा डाळ आयात करार पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.






