Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विहानच्या मृत्यूला जबाबदार कोण?’ चेंबूर दुर्घटनेवरून शिवसेनेचा बीएमसीवर हल्लाबोल; ‘मुंबईतील सर्व झाडांचे ऑडिट करा’

चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूनंतर शिवसेनेने बीएमसीवर गंभीर आरोप करत मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 06:11 PM
'विहानच्या मृत्यूला जबाबदार कोण?' चेंबूर दुर्घटनेवरून शिवसेनेचा बीएमसीवर हल्लाबोल

'विहानच्या मृत्यूला जबाबदार कोण?' चेंबूर दुर्घटनेवरून शिवसेनेचा बीएमसीवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हा मुद्दा आता राजकीय वर्तुळातही गाजू लागला आहे. या दुर्घटनेवरून शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) निष्काळजीपणाचा आरोप करत पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला अधिक आर्थिक मदत देण्याची मागणीही पक्षाने केली आहे.

बीएमसीच्या स्पष्टीकरणावर शिवसेनेचे प्रश्न

शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव शायना एन. सी. यांनी जारी केलेल्या निवेदनात बीएमसीच्या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, बीएमसीने संबंधित झाडाची १२ मे २०२६ रोजी तपासणी करून ते सुरक्षित असल्याचे सांगितले होते आणि २९ मे रोजी त्याची छाटणीही करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान झाडाच्या मुळांचे नुकसान झाल्याची बाब पालिकेच्या चौकशीत समोर आली असून या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

Mumbai Rain Update : धडकी भरवणारं दृश्य! मुसळधार पावसात भांडूपमध्ये रस्ता खचला; टेम्पोसह झाड जमिनीच्या पोटात गायब

‘केवळ पाऊस नव्हे, तर व्यवस्थेचे अपयश’

दुर्घटनेला केवळ मुसळधार पाऊस कारणीभूत नसल्याचा दावा करत शिवसेनेने झाडांच्या देखभालीतील त्रुटी, मुळांची योग्य तपासणी न होणे आणि विभागांतील समन्वयाचा अभाव यामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.

तसेच, स्थानिक पातळीवर यापूर्वी झाडाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचाही दावा पक्षाने केला आहे.

पावसाळ्यापूर्वी झाडांचे ऑडिट करा #Shivsena #EknathShinde pic.twitter.com/B14rnGXwo7 — Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 4, 2026

शिवसेनेच्या चार प्रमुख मागण्या

या घटनेनंतर शिवसेनेने राज्य सरकार आणि बीएमसीसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.

  • पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे तृतीयपक्षीय तज्ज्ञांकडून स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे.
  • केवळ बाह्य तपासणी न करता झाडांच्या मुळांची वैज्ञानिक तपासणी (सोनोग्राफीसह) बंधनकारक करावी.
  • रस्ते विभाग आणि उद्यान विभागातील समन्वयाच्या अभावासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
  • मृत विहान श्रीवास्तव यांच्या कुटुंबाला जाहीर करण्यात आलेल्या ₹२.५ लाखांच्या मदतीऐवजी किमान ₹१० लाखांची आर्थिक मदत द्यावी.
याशिवाय, झाडांबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर ७२ तासांच्या आत कार्यवाही होईल, अशी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मॅनहोल दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना बाल हक्क आयोगाचे निर्देश

आंदोलनाचा इशारा

बीएमसीने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा पक्षाच्या राष्ट्रीय सचिव शायना एन. सी. यांनी दिला आहे. दरम्यान, चेंबूरमधील या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आगामी काळात बीएमसी यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shiv sena demands tree audit after chembur tree collapse vihan srivastava death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai Rain
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ
1

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार
2

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ
3

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल
4

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.