Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायालयांमधील प्रलंबित खटले कमी होणार; दुर्बल घटकांना कायदेशीर मदतीसाठी ‘या’ कार्यक्रमाचे आयोजन

'दर्द से हमदर्द तक (DSHT)' ही संस्था अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे तुरुंगात अडकून पडलेल्या कैद्यांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 07:06 PM
न्यायालयांमधील प्रलंबित खटले कमी होणार; दुर्बल घटकांना कायदेशीर मदतीसाठी ‘या’ कार्यक्रमाचे आयोजन
Follow Us
Follow Us:

‘जस्टिस फॉरवर्ड २०२६’ उपक्रमातून कायदेशीर मदत व्यवस्थेला बळकटी
लीगल एड डिफेन्स कौन्सेल सिस्टीमवरील अभ्यास अहवालाचे प्रकाशन
कायदेशीर मदत व्यवस्था अधिक सक्षम देण्यात आला संदेश

मुंबई: देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा, न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी व्हावी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार कायदेशीर मदत सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘दर्द से हमदर्द तक (DSHT)’ आणि ‘सुप्रा लीगल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जस्टिस फॉरवर्ड २०२६ – स्ट्रेंथनिंग लीगल एड, एम्पॉवरिंग फ्युचर ॲडव्होकेट्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कायदेशीर मदत व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच नवोदित वकिलांना समाजाभिमुख दृष्टीकोन देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमात ‘असेसमेंट स्टडी ऑफ लीगल एड डिफेन्स कौन्सेल सिस्टीम ‘ या महत्त्वपूर्ण अभ्यास अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालामध्ये लीगल एड डिफेन्स कौन्सेल सिस्टीमची सद्यस्थिती, न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांची कारणमीमांसा, कायदेशीर मदत व्यवस्थेतील आव्हाने तसेच ती अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.केंद्रीय कायदा व न्याय मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री  मंगल प्रभात लोढा, भारताचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल अॅड. प्रवीण फळदेसाई, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅड. अनिल सिंह तसेच ‘दर्द से हमदर्द तक (DSHT)’चे संस्थापक अॅड. प्रकाश सालसिंगीकर उपस्थित होते. कायदा क्षेत्रातील अनेक मान्यवर, वरिष्ठ वकील, विधी महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि नवोदित वकिलांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावेळी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री  अर्जुन राम मेघवाल म्हणाले, ‘दर्द से हमदर्द तक’ ही संस्था निःस्वार्थ भावनेने गरजूंसाठी कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे अत्यंत उल्लेखनीय कार्य करत आहे. न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचे योगदान महत्त्वाचे आहे. आज येथे उपस्थित असलेल्या युवा विधी विद्यार्थ्यांनी आणि नवोदित वकिलांनी देशबंधू सी. आर. दास यांच्यासारख्या महान विधिज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. वकिली हा केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचे प्रभावी माध्यम आहे. न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या या कार्यात युवा वकिलांनी पुढाकार घ्यावा.”

तरुणांच्या कौशल्य विकासाला मिळणार गती; Mangal Prabhat Lodha यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, नवोदित वकिलांनी केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर समाजसेवेचे माध्यम म्हणून वकिली व्यवसायाकडे पाहावे, असे आवाहन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

‘दर्द से हमदर्द तक (DSHT)’ ही संस्था अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे तुरुंगात अडकून पडलेल्या कैद्यांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. पात्र वकिलांच्या माध्यमातून कैद्यांना कायदेशीर प्रतिनिधित्व उपलब्ध करून देत न्याय मिळवून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ७०० हून अधिक कैद्यांना मोफत कायदेशीर मदत देण्यात आली असून, अनेक प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्यात संस्थेला यश आले आहे.

Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?

याशिवाय, संस्थेमार्फत नवोदित वकिलांसाठी विशेष इंटर्नशिप आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या माध्यमातून युवा वकिलांना न्यायालयीन प्रक्रिया, लीगल एड यंत्रणा आणि समाजाभिमुख वकिलीचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणे आणि न्यायव्यवस्थेला सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Attended the Justice Forward 2026 programme in Mumbai in the presence of Hon. Union Law & Justice Minister Shri Arjun Ram Meghwal Ji. The initiative by Dard Se Humdard Tak (DSHT) to strengthen the legal aid system and guide young advocates towards meaningful service is a… pic.twitter.com/OSHUoSccmi — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) July 16, 2026

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन, न्यायपालिका, कायदेतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि युवा वकिलांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी कायदेशीर मदत व्यवस्था अधिक बळकट करणे ही काळाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. ‘जस्टिस फॉरवर्ड २०२६’ हा केवळ एक कार्यक्रम नसून न्याय सर्वांसाठी सुलभ, परवडणारा आणि प्रभावी करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Web Title: Strengthening legal aid system through the justice forward 2026 initiative mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Law And Order
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन
1

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
2

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
3

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
4

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.