Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local: लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मोबाइलचा स्फोट; प्रवाशांमध्ये घबराट

Mumbai Local News: मुंबई लोकलच्या महिला डब्यात प्रवास करताना अचानक मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे लोकलच्या डब्यात आग लागून धूर पसरला आणि काही काळासाठी प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 11, 2025 | 05:38 PM
लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मोबाइलचा स्फोट; प्रवाशांमध्ये घबराट (फोटो सौजन्य-X)

लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मोबाइलचा स्फोट; प्रवाशांमध्ये घबराट (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Local News Marathi: मुंबई लोकलच्या महिला डब्यात प्रवास करताना अचानक मोबाईल फोनचा स्फोट झाला, ज्यामुळे डब्यात घबराट पसरली. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सोमवारी रात्री ८:१२ वाजता कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण लोकल ट्रेनमध्ये घडली.

सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या प्राथमिक अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती, असे ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले.यावेळी मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत तातडीने अग्निरोधकाच्या सहाय्याने आग विझवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. ही रेल्वे काही वेळ कळवा स्थानकावर थांबवण्यात आली. सर्व सुरक्षित असल्याची खात्री केल्यावर ही लोकल कल्याणकडे पुन्हा रवाना करण्यात आली.

कृषी मंत्रालयाचा आणखी एक घोटाळा? कीटकनाशक खरेदीत कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा नाना पटोलेंचा आरोप

धूर येताच चेंगराचेंगरी

प्रत्यक्षदर्शींच्या मते, मोबाईल स्फोटानंतर संपूर्ण डब्यात धुर पसरला होता. घाबरलेले प्रवासी ताबडतोब दाराकडे धावले आणि ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागले. रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

कोणाचा मोबाईल फुटला

पोलिसांनी सांगितले की,ज्या महिलेचा मोबाईल फोन स्फोट झाला त्यांची ओळख अजूनही पटलेली नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. बॅटरीमधील काही बिघाडामुळे स्फोट झाला असावा. या घटनेनंतर, पोलिसांनी सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेचा रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.

खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट

यापूर्वी खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला होता. तर एक गंभीर जखमी झाला होता. भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला इथं ही घटना घडली होती. सुरेश संग्रामे असं मृत मुख्याध्यापकाचं नाव आहे. ते नत्थु गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या कपड्याला आग लागली. यात ते भाजले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र नत्थु गायकवाड हा देखील गंभीर जखमी झाला आहे.

Bombay High Court : रमजान-ईदपूर्वी उंटांची बेकायदेशीर तस्करी आणि कत्तल थांबवा! मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Web Title: Suddenly a mobile phone exploded in a mumbai local train confusion started among the passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • mobile
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
3

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
4

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.