Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajan Salvi News: एकनाथ शिंदेचं ‘मिशन टायगर ‘ कामयाब; ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र,’ राजन साळवी हाती धनुष्यबाण घेणार

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मिशन टायगरची चर्चा सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 12, 2025 | 03:38 PM
Rajan Salvi News: एकनाथ शिंदेचं ‘मिशन टायगर ‘ कामयाब; ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र,’ राजन साळवी हाती धनुष्यबाण घेणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:   राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते  राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या (13 फेब्रुवारी) ते शिंदे गटाच प्रवेश कऱणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात  शिंदे गटातून मिशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती.  या मिशन टायगरच्या अंतर्गत ठाकरे गटाचे राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेते नाराज असून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटातील नेते राजन साळवी हे देखील मागील अनेक दिवसांपासून नाराज होते.

Nashik Politics: नाशिकमध्ये काँग्रेसच्या गडाला सुरूंग; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांची आत्तापर्यंत सातव्यांदा चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांच्यासह त्यांचे बंधू दीपक साळवी यांनाही या चौकशीसाठी ‘एसीबी’ने नोटीस बजावली असल्याने तेही यावेळी उपस्थित होते. राजन साळवी यांच्याबरोबर इतर घरातील लोकांची देखील चौकशी केली आहे. त्यामुळे कारवाईचा ससेमेरा थांबवण्यासाठी ते शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आता राजन साळवी हे भाजप प्रवेश करणार आहेत.

पुण्यातील ड्रॅगनफ्लाय प्रजातींच्या संख्येत मोठा बदल; संशोधकांचा महत्त्वपूर्ण अभ्यास

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजन साळवी हे पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास सकाळीच व्यक्त केला होता. खासदार राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सध्या सत्ता आणि पैशाच राजकारण देशभरात सुरू आहे . कार्यवाही आणि भीती यातून हे सर्व होत आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. राजन साळवी आम्हाला सांगत नाहीत काही आणि माझं बोलणं कालच झालं त्यांच्या बोलण्यातून असं काही जाणवत नाहीत. ते वारंवार सांगतात माझ्या डोक्यात अजून असला कुठलाही विचार नाही आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. भविष्याच्या घडामोडी घडतील त्यावर मी भाष्य करेल,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते.

 

Web Title: The first victim of mission tiger rajan salvi of thackeray group will join shinde sena nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
1

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका
2

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत
3

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.