Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी

ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. पक्षांतरानंतर लगेचच त्यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 03:20 PM
ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी

ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी

Follow Us
Follow Us:
  • सचिन अहिर बिनविरोध विजयी
  • सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड
  • शिंदे गटासाठी मोठा राजकीय दिलासा
Sachin Ahir News Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.

सचिन अहिर यांनी मंगळवारी ठाकरे गटाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांच्याविरोधात कोणत्याही सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

Sachin Ahir News: ‘मी पक्ष सोडलेला नाही…’ सचिन अहिरांच्या विधानाने राजकीय पेच वाढला; आमदारकी राहणार की जाणार?

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जागा काही काळापासून रिक्त होती. पावसाळी अधिवेशनादरम्यान हे पद भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सत्ताधारी महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असल्याने सचिन अहिर यांच्या निवडीचा मार्ग जवळपास मोकळा असल्याचे आधीपासूनच स्पष्ट झाले होते.

सचिन अहिर हे मुंबईतील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत काम केले असून आता ते शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्या या पक्षांतरानंतर लगेचच मिळालेल्या उपसभापतीपदामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. उपसभापती म्हणून सचिन अहिर यांच्यावर विधान परिषदेचे कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे चालविण्याची जबाबदारी असणार आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे महायुतीला विधान परिषदेत आणखी एक महत्त्वाचे घटनात्मक पद मिळाले असून सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ आणि राजकीय वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

सचिन अहिर कोण आहेत?

२१ मार्च १९७२ रोजी जन्मलेले सचिन अहिर हे मुंबईतील दहीहंडी महोत्सवासाठी ओळखले जातात. ते आपल्या पत्नीसोबत ‘श्री संकल्प प्रतिष्ठान’ चालवतात, जी संपूर्ण वरळीतील एक लोकप्रिय संस्था आहे. सचिन अहिर सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. ते १९९९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. २००९ मध्ये ते महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री झाले. उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये सचिन अहिर यांची शिवसेनेचे उपनेते म्हणून नियुक्ती केली. सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली आणि नंतर ते शिवसेनेत सामील झाले. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विजयात सचिन अहिर यांची भूमिका असल्याचे मानले जाते. गेल्या निवडणुकीत, शिवसेनेने आदित्य यांना पराभूत करण्यासाठी मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली होती, परंतु मनसेनेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी देऊनही ठाकरे विजयी झाले.

Web Title: Sachin ahir elected unopposed as maharashtra legislative council deputy chairman after joining shinde sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sachin Ahir
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
2

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी
3

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.