Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई विमानतळाचे ‘नामकरण’ की ‘नामांतर’? अधिकृत नाव जाहीर, पण प्रकल्पग्रस्तांचा लढा अजूनही सुरूच!

Navi Mumbai Airport Name: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे अधिकृत नाव सरकारच्या अधिकृत कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा नामकरणासाठी नावे तर नामांतरणासाठी असणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 23, 2025 | 07:38 PM
नामांतरासाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा सुरू आहे लढा (Photo Credit - X)

नामांतरासाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा सुरू आहे लढा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • अधिकृत नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • नामांतरासाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा सुरू आहे लढा
  • नवी मुंबई विमानतळाचे नामकरण की नामांतर ?
Navi Mumbai Airport Marathi News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दि. बा. पाटील (D.B Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला आहे. माहिती अधिकारांतर्गत केंद्र सरकारकडून (Central Goverment) मिळालेल्या एका उत्तरामुळे या वादात नवीन वळण आले असून, नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूमिपुत्रांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.

नवी मुंबई विमानतळाचे ‘नामकरण’ की ‘नामांतर’?

‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे अधिकृत नाव सरकारच्या अधिकृत कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा नामकरणासाठी नावे तर नामांतरणासाठी असणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते तेजस पाटील यांनी राज्यातील विमानतळांच्या नामकरणाबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे विचारणा केली होती.

दोनच विमानतळांना महापुरुषांची नावे

मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी दीपक नागपाल यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, राज्यातील १६ विमानतळांपैकी केवळ मुंबई आणि नागपूर या दोनच विमानतळांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत.

हे देखील वाचा: Raigad News: जासई परिसरात ‘दि. बा. पाटील’ नावाचे फलक झळकले, आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

नामांतरासाठी २५ डिसेंबर ‘निषेध दिवस’

मानकोली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ अशी तीन दिवसीय पायी दिंडी आचारसंहितेमुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. २५ डिसेंबर ‘निषेध दिवस’ विमानतळावरून दिबांच्या नावाविना विमान उडणार असल्याच्या निषेधार्थ २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गावोगावी काळे झेंडे दाखवून आणि काळी फित लावून निषेध नोंदवला जाईल.

आचारसंहितेनंतर मंत्रालयावर धडक

आचारसंहिता संपल्यानंतर पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र अधिक मोठ्या ताकदीने मुंबईतील मंत्रालयावर धडकणार असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

  • १३ जानेवारी २०२६ रोजी दि. बा. पाटील यांची १०० वी जयंती असल्याने जासई येथील स्मृती स्थळावर मोठ्या संख्येने जमून मानवंदना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    राज्यातील विमानतळांची स्थिती
  • मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विमानतळांची विभागणी खालीलप्रमाणे आहे: आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नवी मुंबई आणि शिर्डी.
  • राष्ट्रीय विमानतळ औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जुहू मुंबई, नांदेड, गोंदिया, अकोला, नाशिक, अमरावती आणि सिंधुदुर्ग,
  • मुंबई आणि नागपूर वगळता उर्वरित सर्व विमानतळे सध्या केवळ त्या त्या शहरांच्या नावानेच ओळखली जात असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा: Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळ नामांतरण प्रश्नावर भूमिपुत्र आक्रमक; पायी चालत करणार आंदोलन

Web Title: The official name is navi mumbai international airport project affected people are continuing their struggle for a name change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • Central Governement
  • navi Mumbai Airport

संबंधित बातम्या

GDP New Year Update: भारतीय अर्थव्यवस्था होणार ‘रीसेट’? महागाई आणि वाढीचे नव्याने मोजमाप
1

GDP New Year Update: भारतीय अर्थव्यवस्था होणार ‘रीसेट’? महागाई आणि वाढीचे नव्याने मोजमाप

Agniveer reservation BSF: मोदी सरकारचा मोठा निर्णय; अग्निवीरांसाठी बीएसएफमध्ये ५०टक्के कोटा
2

Agniveer reservation BSF: मोदी सरकारचा मोठा निर्णय; अग्निवीरांसाठी बीएसएफमध्ये ५०टक्के कोटा

OTT कंटेंटवर सेन्सॉर बोर्डाची कात्री चालणार नाही! केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; ‘या’ नियमांनुसार होणार नियंत्रण
3

OTT कंटेंटवर सेन्सॉर बोर्डाची कात्री चालणार नाही! केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; ‘या’ नियमांनुसार होणार नियंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.