Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील धरणसाठ्यात तब्बल 14 टक्क्यांची तूट; 43.70 टक्के उपयुक्त पाणीसाठा

कोकणातील मोठ्या धरणांमध्ये जवळपास ६० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये ५३.५९ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2026 | 08:39 AM
राज्यातील धरणसाठ्यात तब्बल 14 टक्क्यांची तूट; 43.70 टक्के उपयुक्त पाणीसाठा

राज्यातील धरणसाठ्यात तब्बल 14 टक्क्यांची तूट; 43.70 टक्के उपयुक्त पाणीसाठा

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई महानगरासह पुणे, नाशिक आणि रायगड पट्ट्यातील अतिवृष्टीने जलसाठ्यात किंचित वाढ झाली असली तरी राज्यातील बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या विविध भागातील पाणीसाठा कमीच आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण ३ हजार २९ धरणांमध्ये ४३.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५७.७३ टक्के होता.

गेल्यावर्षीच्या तुलनेत ही घट १४ टक्के आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केला असता १३८ मोठ्या धरणांमध्ये ४७.२५ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.७२ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये २८.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कोकणातील मोठ्या धरणांमध्ये जवळपास ६० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये ५३.५९ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे. मात्र, मराठवाड्यातील अनेक मोठे आणि लघु प्रकल्प अजूनही क्षमतेच्या निम्म्यापेक्षाही कमी भरले आहेत.

राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, येडगाव, चासकमान, भामा आसखेड, वडज यांसारख्या धरणांतील साठाही लक्षणीय वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सुमारे ४८.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हवामान विभागाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. या महिन्यात आणखी काही दिवस जोरदार सरी कोसळल्यास जुलैअखेरपर्यंत धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

येरळवाडी धरणात मृत पाणी साठा शिल्लक

मागील वर्षी जून महिन्यात तूफान पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यावेळी सर्व नद्या, तलाव पाण्याने संपूर्ण भरून गेले होते. यावर्षी मात्र जून महिना काही अपवाद वगळता कोरडा गेला आणि आता तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी कमतरता भासू लागली आहे. कधी काळी दुष्काळी खटाव तालुका म्हटलं जायचं. ते आता मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून उरमोडी, तारळी, टेम्बूचं पाणी आल्यामुळे दुष्काळी कलंक पुसत चालला आहे.

येरळवाडी धरणात फक्त 25 टक्के मृत पाणी साठा शिल्लक; वडूजसह अनेक गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर

Web Title: There is a deficit of 14 percent in the state dam reserves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Rain News
  • Water Issue

संबंधित बातम्या

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
1

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर
2

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
3

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात
4

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.