Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी

विशेषतः भात लागवडीसह सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी आणि मका या पिकांच्या पेरण्यांवर प्रतिकूल हवामानाचा परिणाम झाला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकरी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरण्याची वाट पाहत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 12, 2026 | 01:46 PM
अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी

Follow Us
Follow Us:

कराड : यंदाच्या खरीप हंगामात कराड तालुक्यात शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या, तर गेल्या आठ-दहा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. परिणामी, पेरणीची कामे पुन्हा ठप्प झाली असून, तालुक्यातील नियोजित क्षेत्रापैकी अवघ्या २४.६० टक्के क्षेत्रावरच खरीप पेरणी पूर्ण झाली आहे.

कराड तालुक्यात यंदा ३१ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ७ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली असली, तरी जमिनीतील ओलावा कायम असल्याने ट्रॅक्टर व पेरणी यंत्रे शेतात उतरू शकलेली नाहीत. त्यामुळे उर्वरित क्षेत्रातील पेरणी अद्यापही संथ गतीने सुरू आहे.

Jawali Landslide News : जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली

विशेषतः भात लागवडीसह सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी आणि मका या पिकांच्या पेरण्यांवर प्रतिकूल हवामानाचा परिणाम झाला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकरी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम नेहमीपेक्षा उशिरा पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खरीप पेरणीची सद्यस्थिती (हेक्टरमध्ये)

एकूण नियोजित क्षेत्र : ३१,१२७ हेक्टर, पूर्ण पेरणी : ७,६५६ हेक्टर (२४.६० टक्के), पिकनिहाय पेरणी, भात : १,२२७ हेक्टर, खरीप ज्वारी : ३२५ हेक्टर, सोयाबीन : ३,०४४ हेक्टर, भुईमूग : २,३५८ हेक्टर, मका : २ हेक्टर, नवीन ऊस लागवड : २,०२२ हेक्टर.

मुंबईत पावसामुळे 12 जणांचा मृत्यू

सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे झालेल्या १२ जणांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त करत, शिवसेना आमदार (विधान परिषद) नीलम गोऱ्हे यांनी बाधित कुटुंबांसाठी मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली. राम मंदिराशी संबंधित वादावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, कोणत्याही स्तरावर काही अनियमितता झाली असल्यास, दोषींवर निष्पक्ष कारवाई केली जावी.

Web Title: Excessive rainfall stalls karad kharif season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Karad news
  • Rain News

संबंधित बातम्या

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?
1

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?

Karad Burning Car: कृष्णा पुलावर मध्यरात्री धावत्या कारने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
2

Karad Burning Car: कृष्णा पुलावर मध्यरात्री धावत्या कारने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

मोठी बातमी! ‘मनरेगा’ योजना आता शहरातही लागू होणार? आमदार मनोज घोरपडे यांच्या मागणीवर मंत्री गोगावले यांचे मोठे संकेत
3

मोठी बातमी! ‘मनरेगा’ योजना आता शहरातही लागू होणार? आमदार मनोज घोरपडे यांच्या मागणीवर मंत्री गोगावले यांचे मोठे संकेत

वडज धरणातून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; मीना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
4

वडज धरणातून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; मीना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.