Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Airport: नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; ‘जीएमआर’ची ₹३२०० कोटींची योजना

Nagpur Airport: मिहान इंडियाने २५ जून रोजी जीएमआर एअरोला विमानतळ हस्तांतरण केल्यानंतर कंपनीच्यावतीने आगामी तीन दशकांतील योजनांची माहिती देण्यात आली. गुजरात, ओरिसापासून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक शक्य आहे. त्यासाठी कार्गो हबच्या दिशेने प्रयत्न करण्यात येतील.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 09, 2026 | 02:50 PM
Nagpur Airport, GMR Aero, MIHAN Project, Logistic Hub, Aviation Sector, Infrastructure Development,

Nagpur Airport, GMR Aero, MIHAN Project, Logistic Hub, Aviation Sector, Infrastructure Development,

Follow Us
Follow Us:
  • मिहान इंडियाने २५ जून रोजी अधिकृतपणे नागपूर विमानतळ ‘जीएमआर एअरो’ (GMR Aero) कंपनीकडे सुपूर्द
  • मूळ प्रस्तावाच्या वेळी या प्रकल्पाचा खर्च ₹१६०० कोटी अपेक्षित होता
  • अनेक वर्षे रेंगाळल्यामुळे आता हा खर्च दुप्पट म्हणजे सुमारे ₹३२०० कोटी झाला
  • हैदराबाद विमानतळाचा विकास करताना आम्ही त्याला मध्य भारताचे केंद्र मानले होते
 

Nagpur Airport : उपराजधानीचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांसह जागतिक दर्जाचे विमानतळ विकसित करण्याची घोषणा जीएमआर एअरोचे कार्यकारी संचालक एस. जी. के. किशोर आणि नागपूर विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर यांनी बुधवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

मिहान इंडियाने २५ जून रोजी जीएमआर एअरोला विमानतळ हस्तांतरण केल्यानंतर कंपनीच्यावतीने आगामी तीन दशकांतील योजनांची माहिती देण्यात आली. गुजरात, ओरिसापासून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक शक्य आहे. त्यासाठी कार्गो हबच्या दिशेने प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे आगामी ३० वर्षांत ३० लाखांवरून ३ कोटी प्रवासी वाढवण्याची योजना आहे. उर्वरित जमीन लक्षात घेता ‘टर्मिनल ३’ उभारून ५ कोटी प्रवासी हाताळण्याचे नियोजन आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही किशोर व भांडारकर यांनी सांगितले.

Sanjay Raut Slams Sharad Pawar: शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक का घेतली? संजय राऊतांच्या

३२०० कोटींची योजना

या प्रकल्पाचा मूळ प्रस्ताव सुमारे १६०० कोटी रुपयांचा होता. त्यास आता बरीच वर्षे झाली असल्याने ही किमत दुप्पट झाली असावी. त्यामुळे ३२०० कोटींची योजना असली तरी, विकास करताना येणारा खर्च बघून प्रकल्पाची किंमत ठरवण्यात येईल, असे सांगून एस. जी. के. किशोर यांनी प्रकल्पाची किंमत नेमकी किती हा मुद्दा फेटाळून लावला. विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध टप्पे राहतील, प्रवाशांच्या सोयींच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

दक्षिणेकडे वायुसेना भारतीय वायुसेना नियमित: धावपट्टीचा वापर करेल. विमानतळाच्या दक्षिणकडे – एमआयएलकडून त्यांना जागा देण्यात येत आहे. त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.

खऱ्या अर्थाने मध्य भारतात: हैदराबाद येथील विमानतळाचा विकास करताना आम्ही मध्य भारतातील केंद्र म्हणून प्रोजेक्ट केले. तथापि, आता खऱ्या अर्थाने देशाच्या हृदयस्थळी म्हणून मध्य भारताचे खरे स्थान आहे.

Uniform Civil Act: मोठी बातमी! UCC लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारची तयारी; ७ सदस्यीय समिती स्थापन, मुख्यमंत्र्यांची

पहिला टप्पा (एक ते दीड वर्ष)

विद्यमान टर्मिनल तसेच एअरसाईड व लँडसाईड सोयींचे नूतनीकरण
अतिरिक्त चेक-इन काऊंटर्स व सेल्फ चेक-इन किऑस्क
अतिरिक्त एक्स-रे यंत्रांसह सुरक्षा तपासणी क्षेत्राची पुनर्रचना
हँड बॅगेज असणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन एक्सप्रेस सुरक्षा लेन
प्रवाशांच्या अधिक सुलभ प्रवेशासाठी विस्तारित फोरकोर्ट सुरक्षा लेन
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी स्वतंत्र कार्ड लाऊंज
बस बोर्डिंग गेट्स चार करणार

टप्पा दोन (३ ते ४ वर्षे)

प्रारंभी दरवर्षी ४० लाख प्रवासी क्षमता असलेले एकात्मिक प्रवासी टर्मिनल
अतिरिक्त कॉन्टॅक्ट व रिमोट एअरक्राफ्ट स्टँड्स
एकात्मिक प्रक्रिया क्षमतेसह नवीन कार्गो टर्मिनल (वार्षिक २० हजार मेट्रिक टन क्षमता)
इन-फ्लाईट किचन, भूमिगत इंधन हाताळणी प्रणाली
विस्तारित वाहनतळ व प्रवेश मार्गाचा विकास
व्यावसायिक तसेच सिटी साईड डेव्हलपमेंट उपक्रम

टप्पा तीन (५ ते ८ वर्षे)

दुसऱ्या धावपट्टीचे बांधकाम
नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर व तांत्रिक इमारत
स्वतंत्र वीज व जलपुरवठा सोयी

 

Web Title: Nagpur airport expansion gmr aero plans 3200 crore logistic cargo hub terminal 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis
  • Infrastructure
  • maharashtra news
  • Maharashtra Politics
  • Nagpur Airport

संबंधित बातम्या

Sanjay Raut Slams Sharad Pawar: शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक का घेतली? संजय राऊतांच्या प्रश्नांनी राजकारण तापणार
1

Sanjay Raut Slams Sharad Pawar: शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक का घेतली? संजय राऊतांच्या प्रश्नांनी राजकारण तापणार

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?
2

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ
3

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ

Tukaram Mundhe News: जर एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर? तुकाराम मुंढेंनी दिले उत्तर
4

Tukaram Mundhe News: जर एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर? तुकाराम मुंढेंनी दिले उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.