Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! सरकार वचनबद्ध; मंत्री अतुल सावे यांची मोठी ग्वाही

मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या भीतीवर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 09, 2025 | 08:48 PM
ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! सरकार वचनबद्ध; मंत्री अतुल सावे यांची मोठी ग्वाही
Follow Us
Close
Follow Us:
  • ओबीसी आरक्षणाला धक्का नाही!
  • सरकार वचनबद्ध; मंत्री अतुल सावे यांची मोठी ग्वाही
  • मराठा आरक्षणावरून स्पष्टीकरण

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी दिली आहे. ‘ओबीसी’ समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला आमदार डॉ. परिणय फुके, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाज आणि राष्ट्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे उपस्थित होते.

मराठा आरक्षणावरून स्पष्टीकरण

मंत्री अतुल सावे म्हणाले की, मराठा आरक्षणावरील शासन निर्णय हा सरसकट नसून, पुराव्यांशी संबंधित आहे. फक्त कुणबी असल्याचा पुरावा असणाऱ्यांनाच त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे ओबीसी आरक्षण अबाधित राहील. राज्यात किती कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत याची संपूर्ण माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून, त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्यांवर सविस्तरपणे चर्चा केली जाणार आहे.

जतमध्ये ओबीसी समाजाची तहसीलदारांकडे धाव; समाजावर अन्याय करणारा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी

‘महाज्योती’ संस्था अधिक सक्षम करणार

श्री. सावे म्हणाले की, ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ‘महाज्योती’ संस्थेला अधिक सक्षम करण्यात येणार असून, तिच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यात येईल. परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थीसंख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, नवीन वसतिगृहे सुरू करण्याचे नियोजन असून, ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. प्राप्त झालेल्या मागण्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्या जातील, तर उर्वरित मागण्यांबाबत एका महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत राज्यातील ‘ओबीसी’ समाजाच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

Web Title: There is no setback to obc reservation the government is committed minister atul saves big assurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • maratha obc reservation
  • Maratha Reservation
  • Mumbai News
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
1

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

जतमध्ये ओबीसी समाजाची तहसीलदारांकडे धाव; समाजावर अन्याय करणारा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी
2

जतमध्ये ओबीसी समाजाची तहसीलदारांकडे धाव; समाजावर अन्याय करणारा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी

Maratha Reservation : “ओबीसी समाजाचे खरे विरोधक हे आता भाजपा आहेत…; वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले
3

Maratha Reservation : “ओबीसी समाजाचे खरे विरोधक हे आता भाजपा आहेत…; वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा…; मंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?
4

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा…; मंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.