मुंबई: सेंट्रल रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कस्टमर केअर विभागाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर हा कॉल करण्यात आला. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तैयबाचा सीईओ असल्याचे सांगत बँकेचा मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असे म्हणत फोन बंद केला. या कॉलनंतर बँकेच एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकीचा कॉल गांभीर्याने घेत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे कृत्य कुठल्यातरी भंपक व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलीस तपासात करत आहेत.
बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही; अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचे सडतोड प्रत्युत्तर
एनआयएच्या सूत्रांचे दिलेल्या माहितीनुसार, अशाकॉल्सचा उद्देश केवळ धमकी देणे नाही तर भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे देखील आहे. विमानतळासारख्या गजबजलेल्या ठिकाणी अराजकतेचे वातावरण निर्माण करणे आणि हानी पोहोचवणे हाच असे कॉल करण्यामागचा उद्देश असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
दरम्यान, याआधी गुरुवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईतील जेएसए लॉ फर्म बॅलार्ड पेअर आणि जेएसए कार्यालय कमला मिल लोअर पर्ल यांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या धमकी देणाऱ्या मेल कंपनीच्या ईमेल आयडीवर फरझान अहमद असे नाव लिहिले होते. जेएफए फर्मच्या कार्यालयात आणि बॅलार्ड इस्टेटच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे या मेलमध्ये लिहिले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.
आयफोनसाठी लाँच झालं नवीन फीचर! युजर्ससाठी फायदेशीर, चोर आणि पोलिसांसाठी ठरणार
याआधी इंडियन एअरलाइन्सलाही सातत्याने खोटे कॉल येत होते, त्यापैकी बहुतांश परदेशातील होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) एअरलाइन्सला आलेल्या धमक्यांच्या कॉल्सचाही तपास करत आहेत . गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शाळा, हॉटेल, विमानतळ, बाजारपेठ, रेल्वे, बस आदी ठिकाणी बॉम्बच्या धमक्या सातत्याने वाढत आहेत. 27 ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावर एका CISF जवानाला धमकी देण्यात आली होती. विमान उडवले तर कोणीही वाचणार नाही, असे सांगण्यात आले. चौकशीत ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.