Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारने अखेर घोषणा केलीच ! ‘या’ वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, संबंधित टोल कंत्राटदारांना राज्य शासनाकडून भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2026 | 10:01 AM
सरकारने अखेर घोषणा केलीच ! 'या' वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

सरकारने अखेर घोषणा केलीच ! 'या' वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

Follow Us
Follow Us:

मुंबई : दरवर्षी पालखी सोहळा आयोजित केला जातो. सरकारकडून वारकऱ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय घेतले जातात. त्यातच आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार ६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व परतणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या टोलमाफी नसलेल्या बसेसलाही या कालावधीत टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, संबंधित टोल कंत्राटदारांना राज्य शासनाकडून भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. आषाढी वारीसाठी टोलमाफी, रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे. वारी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, खड्डेमुक्ती, दिशादर्शक फलक उभारणी तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष भर दिला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षा व्यवस्थेवरही भर

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळुरू, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूरसह प्रमुख मार्गावर रुग्णवाहिका, क्रेन आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार जड वाहनांवर तात्पुरती वाहतूक बंदी घालण्याचे अधिकार परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.

पोलिस मदतकेंद्रही असणार

दर २० ते २५ किलोमीटरवर पोलिस मदत केंद्र, रुग्णवाहिका, क्रेन आणि खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारकरी वाहनांना टोलमाफी व पास वितरणाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाही

दुसरीकडे, राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल. याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: Toll exemption for pilgrims vehicles for the wari pilgrimage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.