
राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्गातून पुण्यात बदली
मुंबई : राज्य सरकारने 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या गुरूवारी (दि.3) बदल्या केल्या आहेत. रवींद्र खेबुडकर (सीईओ, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग) यांची आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे येथे, गजेंद्र बावणे (आयुक्त, जीएसडीए, पुणे) यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर येथे तर डॉ. अपूर्वा बासुर, (प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार) यांची सीईओ, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे बदली करण्यात आली.
विशाल खत्री (प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू) यांची सीईओ, जिल्हा परिषद, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डोनुरू अनन्या रेड्डी (अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नांदेड) यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी. के. सिद्धार्थ रामकुमार (अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक) यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच कुश मोटवानी (अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नागपूर) यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा तथा उपविभागीय अधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदला साईकिरण यांची भंडाऱ्यात बदली
आकाश वर्मा, अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, वाशिम यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर, नंदला साईकिरण, अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंदिया यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश कुमार मीना, अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव तथा उपविभागीय अधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवांश सिंह यांची गडचिरोलीला बदली
शिवांश सिंह, अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नंदुरबार यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
UPSC परीक्षेत अग्निहोत्री टॉप
UPSC परीक्षेत अग्निहोत्री टॉपर राहिले आहेत. अनुज अग्निहोत्री आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देतात. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा त्यांना नेहमीच आईकडून मिळाली. “समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी लोकांची सेवा करावी,” अशी प्रेरणा आई नेहमी देत असे, असे अनुज सांगतात. त्यामुळे करिअरची दिशा ठरवण्यापूर्वीच समाजासाठी मोठे योगदान देण्याचा निर्धार त्यांनी केला होता.
राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती