Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती

पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर सभागृहात आयोजित भटके विमुक्त दिवसाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ‘वनार्टी’च्या माहिती पुस्तकाचेही राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 03, 2026 | 03:13 PM
राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती

Follow Us
Follow Us:

पुणे : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षणाच्या संधी तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या उपक्रमांची माहिती थेट पोहोचविण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी)च्या ‘सेवादूत’ प्रकल्पाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सुरुवात झाली. पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर सभागृहात आयोजित भटके विमुक्त दिवसाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ‘वनार्टी’च्या माहिती पुस्तकाचेही राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी सेवादूत प्रकल्पातील मिरा मोटे व सुनिल पवार या दोन सेवादूतांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.  महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे, आमदार निलम गोऱ्हे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, ‘वनार्टी’ प्रकल्प अधिकारी डॉ. चेतन बन्सोड यांची उपस्थिती होती.

‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पांतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ७२ सेवादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील महिला व पुरुष उमेदवारांकडून यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजना आणि ‘वनार्टी’च्या उपक्रमांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच प्रशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती देणे, ही सेवादूतांची प्रमुख जबाबदारी राहणार आहे. शासकीय योजनांची माहिती अनेकदा ग्रामीण व दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही. ही माहितीची दरी भरून काढण्यासाठी सेवादूत ‘वनार्टी’ आणि लाभार्थी यांच्यातील प्रत्यक्ष दुवा म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे योजनांची माहिती मिळविण्यापासून अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध संधींचा लाभ घेण्यापर्यंत लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या ‘वनार्टी’च्या माहिती पुस्तकात संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. या माहिती पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना व लाभार्थ्यांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा : टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

सेवादूतांमुळे ‘वनार्टी’चा जनसंपर्क वाढणार : अतुल सावे

‘वनार्टी’च्या योजना आणि उपक्रमांचा थेट लाभ गरजू विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सेवादूत’ प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शासकीय योजना उपलब्ध असूनही अनेकदा माहितीअभावी पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. ही दरी दूर करण्यासाठी ३६ जिल्ह्यांत नियुक्त होणारे ७२ सेवादूत योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच गरजू लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतील, असा विश्वास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केला. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करतानाच प्रत्यक्ष जनसंपर्कावरही भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधींची माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सेवादूत करतील. ‘सेवादूत’ हे शासनाच्या योजना आणि लाभार्थी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील. त्यामुळे ‘वनार्टी’च्या उपक्रमांना अधिक व्यापक लोकाभिमुखता मिळून त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असेही अतुल सावे यांनी सांगितले.

Web Title: The vanarti sevadoot project has been launched in pune at the hands of the governor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • dr. Neelam Gorhe
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
1

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली
2

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
3

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
4

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.