Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले

मुंबईकरांसाठी वर्षाखेर आनंदाची! ३१ डिसेंबरपासून मेट्रो ९ (दहिसर ते काशीगाव) आणि २-बी चे निवडक टप्पे सुरू होणार आहेत. प्रवासाचा वेळ वाचणार आणि वाहतूक कोंडी फुटणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 18, 2025 | 06:54 PM
मुंबईकरांसाठी 'न्यू इयर गिफ्ट'! (Photo Credit- X)

मुंबईकरांसाठी 'न्यू इयर गिफ्ट'! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • थर्टी फर्स्टला मेट्रोचा धमाका!
  • मुंबईकरांचा प्रवास आता ‘सुसाट’
  • ३१ डिसेंबरपासून नव्या मेट्रो मार्गिका सुरू.
Mumbai Metro 9 and 2B Opening: सरत्या वर्षाला निरोप देताना मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाईन २-बी या दोन महत्त्वाच्या मार्गांचे निवडक टप्पे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या दोन्ही मार्गांच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले आहे.

मेट्रो लाईन ९: दहिसर ते मीरा-भाईंदर (उत्तर मुंबईसाठी दिलासा)

दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर हा मार्ग विद्यमान मेट्रो लाईन ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चा विस्तारित भाग आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते काशीगाव दरम्यान मेट्रो धावणार आहे. वेगाने विकसित होत असलेल्या मीरा-भाईंदर परिसरातील प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि दहिसर चेकनाक्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल. या मार्गावरील नवीन स्थानकांवर मेट्रो गाड्या सज्ज आहेत. ट्रॅक आणि रोलिंग स्टॉकचे काम पूर्ण झाले असून अंतिम सुरक्षा तपासणी आणि परवानग्यांची प्रक्रिया सुरू आहे.

हे देखील वाचा: Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

मेट्रो लाईन २-बी: पूर्व उपनगरांची कनेक्टिव्हिटी वाढणार

मेट्रो लाईन २-बी (डी.एन. नगर ते मंडाले) च्या काही महत्त्वाच्या टप्प्यांचेही ३१ डिसेंबरला उद्घाटन होणे अपेक्षित आहे. यामुळे मुंबईच्या मेट्रो जाळ्याचा विस्तार होऊन पूर्व उपनगरातील प्रवाशांना एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ मिळेल.

मुंबईकरांना होणारे फायदे:

  • लोकल रेल्वेवरील ताण कमी: मेट्रोचे जाळे विस्तारल्यामुळे उपनगरीय लोकल रेल्वेमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
  • कमी वेळात प्रवास: रस्ते वाहतुकीच्या तुलनेत मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ ३० ते ४० टक्क्यांनी कमी होईल.
  • आधुनिक प्रवास: मुंबईकरांना वातानुकूलित, सुरक्षित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल.
मेट्रो मार्ग मार्गिका टप्पा उद्घाटनाची तारीख (अपेक्षित)
मेट्रो लाईन ९ दहिसर पूर्व ते काशीगाव ३१ डिसेंबर २०२५
मेट्रो लाईन २-बी निवडक टप्पे ३१ डिसेंबर २०२५
यंत्रणा एमएमआरडीए (MMRDA) –

हे देखील वाचा: Mumbai Metro: मुंबईकरांचा मेट्रोप्रवास गर्दीमुक्त होणार! घाटकोपर-वर्सोवा मेट्रो लवकरच सहा डब्यांची; ‘मेट्रो-वन’ची तयारी

Web Title: Two new metro lines will be opened for mumbaikars on december 31st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • BMC
  • MMRDA
  • Mumbai
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Mumbai Local Train : आता लोकलचा प्रवास होणार आरमदायी! २३८ नवीन ट्रेनमध्ये असणार स्वयंचलित दरवाजे
1

Mumbai Local Train : आता लोकलचा प्रवास होणार आरमदायी! २३८ नवीन ट्रेनमध्ये असणार स्वयंचलित दरवाजे

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीचे भाव आभाळाला! सर्वसामान्यांचे डोळेच फिरले, जाणून घ्या आजचा दर 
2

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीचे भाव आभाळाला! सर्वसामान्यांचे डोळेच फिरले, जाणून घ्या आजचा दर 

BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने
3

BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने

Mangal Prabhat Lodha : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार, मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन
4

Mangal Prabhat Lodha : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार, मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.