Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत फटाके स्टॉल, अचानक आग लागली तर जबाबदारी कोणाची?

दिवाळीच्या पाश्वभूमीवर नवी मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत फटाके स्टॉल उभारण्यात आले आहे. हे स्टॉल्स वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात आल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 19, 2025 | 09:46 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई : दिवाळी सणाचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय. गल्ली–बोळ, बाजारपेठा आणि सोसायट्यांमध्ये विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, या आनंदाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत काही ठिकाणी परवानगीशिवाय फटाके स्टॉल उभारले जात आहेत. त्यामुळे आग किंवा स्फोटासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली असून नागरिकांनी यावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. या काळात कपडे, मिठाई आणि फटाके खरेदी करण्याची परंपरा आहे. फटाक्यांच्या विक्रीसाठी पालिका, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असते. परंतु नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९, कोपरखैरणे, नेरुळ, सीबीडी बेलापूर, खारघर आणि ऐरोली परिसरात अनधिकृत फटाके स्टॉल उभारले गेले आहेत. हे स्टॉल गर्दीच्या ठिकाणी, नागरिकांच्या रहदारीच्या भागातच लागले असल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वडगावमधील पाणी प्रश्न कायमचा सुटणार! ४० कोटी रुपयांच्या विकासकामांचे DCM अजित पवार हस्ते होणार भूमिपूजन

अशा अनधिकृत स्टॉलवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांचा प्रश्न असा आहे की “अशा ठिकाणी आग लागली किंवा स्फोट झाला, तर जबाबदार कोण?”

तज्ञांच्या मते, जर फटाके विक्री लायसनशिवाय केली जात असेल, तर तो व्यवसाय पूर्णतः बेकायदेशीर मानला जातो. दुर्घटना घडल्यास पहिली जबाबदारी स्टॉलधारकाची असते, त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन विभागाची चौकशीची जबाबदारी येते.

अग्निशमन विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “फटाक्यांचा साठा किंवा विक्री करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. नियमभंग केल्यास दंड किंवा गुन्हा दाखल होऊ शकतो.” त्याचप्रमाणे पोलीस आणि महापालिका प्रशासनालाही असे अनधिकृत स्टॉल शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Thane News: अडीच वर्षांची ‘वियाना’ घरातून बेपत्ता! दिवाळीच्या तोंडावर कुटुंब हादरले; पोलीस धावले अन्…

प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, “फटाके फक्त परवानाधारक स्टॉलमधूनच खरेदी करा.”
तसेच छोटे व्यापारी, जे उपजीविकेसाठी फटाक्यांचा व्यवसाय करतात, त्यांनी अग्निशमन दलाचे परवाना, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाची परवानगी घेऊनच विक्री करावी, असा सल्ला दिला आहे.

Web Title: Unauthorized firecracker stalls at places in navi mumbai harmful for citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • Diwali
  • maharashtra news
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स
1

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स

Special Trains 2025: दिवाळी आणि छट पूजेसाठी रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! ‘या’ मार्गांवर धावणार १,७०२ विशेष ट्रेन्स
2

Special Trains 2025: दिवाळी आणि छट पूजेसाठी रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! ‘या’ मार्गांवर धावणार १,७०२ विशेष ट्रेन्स

Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन
3

Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन

Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला, वारकऱ्यांमध्ये संताप
4

Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला, वारकऱ्यांमध्ये संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.