
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! १२ आणि १३ डिसेंबरला पाणीपुरवठा बंद (Photo Credit- X)
उरणमध्ये आठवड्यातून दोनदा पाणी कपात
रानसाई धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे MIDC ने उरण परिसरात पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात प्रत्येक आठवड्यातून दोनदा – मंगळवार आणि शुक्रवार – लागू राहील. रानसाई धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाल्यामुळे पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले होते. उरण क्षेत्राला दररोज सुमारे ४१ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे, परंतु MIDC सध्या केवळ ३० दशलक्ष लिटर पाणी पुरवत आहे. पाण्याची १० दशलक्ष लिटर प्रतिदिनची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी हे उपाय योजले आहेत, जेणेकरून जून २०२६ पर्यंत पाणी उपलब्ध राहील.
मुंबईत १२-१३ डिसेंबरला २४ तासांचा वॉटर कट
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) १२ ते १३ डिसेंबरदरम्यान २४ तासांसाठी मोठ्या जलकपातीची घोषणा केली आहे. ही पाणीपुरवठा बंदी शुक्रवार (१२ डिसेंबर) सकाळी ९ वाजल्यापासून शनिवार (१३ डिसेंबर) सकाळी ९ वाजेपर्यंत लागू राहील.
ही कपात प्रामुख्याने मोठ्या पाईपलाईन कनेक्शनच्या कामामुळे केली जात आहे. यात १,८०० मिमी तानसा वेस्ट, १,२०० मिमी, २,४०० मिमी वैतरणा आणि १,५०० मिमी पाईपलाईन जोडण्याचे काम समाविष्ट आहे.
मुंबईतील ‘या’ भागांना फटका बसणार
या २४ तासांच्या पाणी कपातीमुळे मुंबईतील अनेक प्रमुख वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, तर काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी असेल:
| वॉर्ड (Wards) | प्रभावित क्षेत्रे |
| के ईस्ट (K East) | जोगेश्वरी आणि अंधेरी ईस्ट |
| एच ईस्ट (H East) | खार आणि बांद्रा ईस्ट |
| जी नॉर्थ (G North) | धारावी |
इतर प्रभावित भाग (१३ डिसेंबर):