Sanjay Raut on Maratha Andolan: फडणवीस सरकारने मराठा आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबाणीचं केली असं म्हणायला हवं, मराठी माणसं मोठ्या संख्यने आले आहेत. शांततेत आंदोलन करत आहे, हे बहुतेक सरकाराला पाहवत नाहीये. मुंबई हजारोंच्या संख्येने एकवटली आहे. त्याचा कोणाला त्रास होतोय का, काही धनिक भाजपचे समर्थक, त्यांचे धनी, भाजपला मदत करणारे व्यापारी, यांना या आंदोलनाचा त्रास होतोय का, यांना त्रास होत असेल त्यांमुळे सरकारने मराठा आंदोलनाला एक-एक दिवसाची मुदतवाढ दिली असावी, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
आंदोलनाच्या चुलीवर कोणी पोळी भाजू नये, असं फडणवीस म्हणत आहेत. पण ही पोळी आतापर्यंत भाजण्याचं काम आपणच केलं आहे, अशी टिकाही संजय राऊत यांनी केली. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासंदर्भात आपलं वक्तव्य काय होतं. ‘या सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही’ असं आपण म्हणत होतात. आपली राजकीय इच्छा शक्ती असती तर एक दिवसात आरक्षण देऊ शकला असतात, आता तुमची राजकीय इच्छाक्ती अरबी समुद्रात बुडाली आहे, आपण राजकीय इच्छा शक्तीचे महामेरू आहात,असं मी मानतो. मग त्या राजकीय इच्छाशक्तीचे काय झाले, त्यासाठी एखादी एसआयटी आपण नेमायला हवी.” असा टोलाही त्यांनी लगावला.
‘आम्हाला आरक्षण हवय, राजकारण नकोय, पण मुख्यमंत्र्यांना….’, आता काय आहे मनोज जरांगेंची नवीन मागणी?
दोन समाजात आग लावण्याची आणि तेढ लावून खेळ बघण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत, असं फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षाला आग लावण्याच काय पडलयं, सरकार कुणाचं आहे. सत्ता कुणाची आहे. दोन समाजात आग लावून निवडणुकीत उतरण्याचे धंदे आपले आहेत. हे आम्ही विधानसभेतही पाहिल. लोकसभेतही पाहिलं, आताही आपण महाराष्ट्रातील दोन समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम, सत्ताधारी एकत्रितपणे करत आहे. सत्तेतील तीनही पक्ष दोन समाजाला वेठीस धरण्याचे काम करत आहेत.
महाराष्ट्रातील एक मोठा समाज आज रस्त्यावर आहे, चिखलात आहे. त्यासंर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे. पण आपल्या चेहऱ्यावर सहानुभूतीचा लवलेशही दिसत नाही. टॉयलेट्स नाही. पाणी नाही, हॉटेल्स बंद करून ठेवली आहेत, अशी तक्रार आझाद मैदानातील आंदोलक करत आहेत. मग राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही. तुम्ही विरोधी पक्षात असताना याच आंदोलकांच्या मागण्या मान्य करू, असं तुम्ही म्हणत होतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.’ असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
फडणवीस आणि शिंदे या दोघांचेही केंद्रात वजन आहे. सरकाही तुमचेच आहे. देवेंद्र फडणवीसांचे वज पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तर एकनाथ शिंदे यांचे वजन अमित शहा यांच्याकडे आहे. दोन्ही नेत्यांचे मन वळवण्याचे आणि आरक्षणासाठी नवा कायदा करण्याचे काम फडणवीस आणि शिंदेंनी केलं पाहिजे. संविधानाच्या चौकटीत बसायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण संविधान बदलण्याचे कामही तुमचेच आहे. संविधान आताही बदललंच ना, आमदार, खासदार मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी तुम्ही संविधानात बदल करू शकता, आपल्या राजकीय विरोधकांनी पद सोडावं, त्यांना अटक करावी, यासाठी तुम्ही संविधान बदलू शकता. मग महाराष्ट्रातील मराठा समाज, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक बदलांसाठी रस्त्यावरउतरला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय आहे. असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.
Maratha Reservation : राज्य सरकारने अखेर जीआर काढलाच; मराठा समाजाला आता ‘हा’ होणार मोठा फायदा
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांची चर्चा करायला हवी, सर्वांना एकत्रित घेऊन जरांगे पाटील यांची भेट घायला हवी, त्यातून काय मार्ग काढता येईल, हे पाहायला पाहिजे, तुमच्या पक्षात तीन वेगळे पक्ष आहेत. शिंदे आंदोलकांना मदत करत आहेत, फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी. देवेंद्र फडणवीस यांची वेगळी भूमिका आहे. अजित पवार चीनच्या भिंती प्रमाणे तटस्थ आहेत, ही आहे काय राजकीय ईच्छा शक्ती येणार कुठून, मग संविधानाची चौकट बदलणार कशी, या सगळ्यात मनोज जरांगे यांचे प्राण पणाला लागले आहेत.
‘न्यायालयाने आरक्षण नाकारलं त्याचं कारण संविधान. संविधानामुळे हे आरक्षण नाकारण्यात आले आणि ते या मूर्ख नेत्यांना कळत नाही. तुम्ही घाईघाईत ते आरक्षण दिलं. संविधानाचा अभ्यास केला नाही. आरक्षणासाठी तुम्हाला संविधानात काही बदल करावे लागतील, त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या दरबारात जावं लागेल, संविधानाची चौकट पाळून जे करायचं आहे ते करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.तरीही तुम्ही उद्धव ठाकरे अमुक तमूक करत असलात तर तो तुमचा डरपोकपणा आहे.’ असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.