Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन बारामतीतून धावणार, भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच; अर्थसंकल्पात ६ हजार कोटींची तरतूद

Mumbai Pune Baramati Hyderabad Bullet Train: मुंबई-पुणे-बारामती-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन लवकरच सुरू होणार असून केंद्राकडून ६ हजार कोटींच्या तरतुदीची शक्यता आहे. सविस्तर माहिती वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 30, 2026 | 07:52 PM
मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन बारामतीतून धावणार (Photo Credit- X)

मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन बारामतीतून धावणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन बारामतीतून धावणार
  • भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच
  • अर्थसंकल्पात ६ हजार कोटींची तरतूद
बारामती : अमोल तोरणे: मुंबई–पुणे–बारामती–हैदराबाद या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे असून, या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीसह संपूर्ण परिसरात या प्रकल्पाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारामतीमध्ये विविध क्षेत्रातील नागरिक, शेतकरी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यावेळी प्रकल्पाबाबत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी बागायती व ऊस पट्ट्यातून बुलेट ट्रेनचा मार्ग नेऊ नये, अशी भूमिका मांडत शेतीचे होणारे नुकसान टाळण्याची मागणी केली होती.

मात्र हा प्रकल्प केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमातील असल्याने त्याची अंमलबजावणी पुढे नेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. प्रस्तावित मार्गानुसार मुंबईनंतर पुणे, बारामती, पंढरपूर आणि पुढे हैदराबाद अशी प्रमुख स्थानके असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बारामतीहून मुंबई किंवा हैदराबाद येथे अवघ्या अडीच ते तीन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.

Bullet Train Driver Eligibility: भारतात बुलेट ट्रेन ड्रायव्हर कसे बनायचे? जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया!

या प्रकल्पाच्या कामा संदर्भात संबंधित यंत्रणेने मार्किंग देखील केले आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर सुमारे दहा वर्षांत काम पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित विभागाकडून भूसंपादनाबाबत अधिकृत अधिसूचना येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, बारामती–फलटण रेल्वेमार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अंतिम टप्प्यात असून, नगर–बारामती–फलटण–दहिवडी–चिकोडी राष्ट्रीय महामार्गाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालाही लवकरच प्रत्यक्ष प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ आणि आता बुलेट ट्रेन अशा चारही महत्त्वाच्या वाहतूक सुविधांचा संगम झाल्यास बारामती राज्यातील एक महत्त्वाचे दळणवळण व औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येईल. उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता असून, आगामी काळात बारामतीच्या आर्थिक उलाढालीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? मुंबई-अहमदाबाद मार्गाबाबत मोठी माहिती समोर

Web Title: Mumbaihyderabad bullet train to pass through baramati land acquisition process to begin soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • baramati
  • Bullet Train
  • Hyderabad
  • Pune

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
2

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
3

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
4

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.