Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati: कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली शस्त्रसाठा; चार कोयते अन् तलवार जप्त, 4 जणांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Baramati Sharp Weapons Seized in Wrestling Centre : बारामतीच्या कसबा परिसरातील कुस्तीच्या तालमीत लाल मातीखाली लपवलेले चार धारदार कोयते आणि एक तलवार पोलिसांनी जप्त केली असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 02, 2026 | 08:16 PM
Baramati Weapons Seized

Baramati Weapons Seized

Follow Us
Follow Us:
  • कुस्तीच्या तालमीत घातपाताचा कट?
  • लाल मातीखाली सापडले घातक शस्त्र
  • चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

बारामती : कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली लपवून ठेवलेले चार धारदार कोयते आणि एक तलवार असा घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी उघडकीस आणला. पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी योगेश उर्फ धन्या गोकुळ कांबळे, आदेश संजय कुचेकर, ऋषिकेश उर्फ पप्पू अनिल चंदनशिवे आणि अभिजीत प्रदीप शिंदे या चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(Baramati)

CIDCO : सिडकोचा मोठा निर्णय! प्रत्येक नोडमध्ये 24 तास पाणी बंद; 2 नोव्हेंबरपासून 15 टक्के पाणीकपात लागू

बारामती शहरातील कसबा परिसरातील जामदार रोडवरील गणेश मंदिराशेजारी असलेल्या कुस्तीच्या तालमीत शस्त्रे लपविल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य वसंतराव कदम यांना ३१ ऑक्टोबर रोजी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शोधमोहीम राबवून शस्त्रे जप्त केली.

याप्रकरणी पोलीस शिपाई गिरीश गणपत नेवसे यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९८/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपींविरुद्ध मिळून यापूर्वी ११ गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण आणि मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. काही प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांतील दोषसिद्धीबाबत स्वतंत्र न्यायालयीन निष्कर्ष लागू राहतील.

जप्त शस्त्रे कोठून आणली, ती तालमीत कोणी लपवली, कोणावर हल्ल्याचे नियोजन होते आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर, हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजीत एकशिंगे, शिपाई गिरीश नेवसे, सादिक काझी आणि अक्षय सिताफ यांचा सहभाग होता. गुन्हा नोंदणीची कार्यवाही हवालदार बनसोडे यांनी केली.

Buldhana: दुष्काळात अळीचा घाला! तुरीच्या शेंगा पोखरल्या, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारामतीमध्ये शस्त्रसाठा नेमका कुठे सापडला?

    Ans: बारामती शहरातील कसबा परिसरातील जामदार रोडवर गणेश मंदिराशेजारी असलेल्या कुस्तीच्या तालमीत हा शस्त्रसाठा आढळला.

  • Que: बारामतीमध्ये पोलिसांनी कुस्तीच्या तालमीतून काय जप्त केले?

    Ans: पोलिसांनी कसबा परिसरातील कुस्तीच्या तालमीत लाल मातीखाली लपवलेले चार धारदार कोयते आणि एक तलवार जप्त केली.

  • Que: या प्रकरणात किती जणांना अटक करण्यात आली?

    Ans: योगेश कांबळे, आदेश कुचेकर, ऋषिकेश चंदनशिवे आणि अभिजीत शिंदे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Baramati weapons seized wrestling centre four accused arrested pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime News
  • Maharashtra Wrestling
  • Sharp Weapons

संबंधित बातम्या

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात
1

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट
2

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट

Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर
3

Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.