मुंबईत गोवर या साथीरोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगाचे बळी हे लहान मुले आहे, कोरोना ह्या भयकन रोगातून सावरत असताना आता मुंबईत गोवरचा शिरकाव होत आहे. लहान मुलांमध्ये या आजाराचा विळखा अधिक असल्याने सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. चिमुकल्यांना या संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यासोबतच कोणती लक्षणं दिसल्यास तातडीने उपचार करावेत गोवर ची लसीकरण मोहिम देखील चालवण्यात येत आहे.
#गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन @mybmc ने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना दूरध्वनीवरून दिले.#Measles pic.twitter.com/wQVMLaIhkZ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 15, 2022
पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे, यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जाणून घेतली. #गोवर झालेल्या मुलांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांत आवश्यक औषधे ठेवावीत. संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरणाचा वेग वाढविण्याचेही त्यांनी निर्देश दिले. pic.twitter.com/5EOupYAfSK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 15, 2022