मुंबई – मुंबईकरांनो उद्या जर रेल्वेनं बाहेर फिरण्याचा बेत असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करणार असाल तर अडकून पडण्याची शक्यता आहे, त्यामुळं ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. उद्या मध्य (Central) व हार्बर रेल्वे तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर (mega block) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं उद्या घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की वाचा. (Mumbaikars must read this news before going out of the house, on which line of railway mega block tomorrow? Check out the schedule)
ठाणे- कल्याण अप-डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील व त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित आगमन वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड स्थानकापुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
मेल/एक्स्प्रेस गाड्या…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणार्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर लाईन (नेरुळ आणि किले दरम्यानच्या BSU लाईनसह आणि तुर्भे आणि नेरुळ दरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गांसह) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ट्रान्स हार्बर
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणार्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. नेरुळ येथून सकाळी १०.५० ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.५५ ते दुपारी ४.३३ पर्यंत नेरुळ करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहतील.
सकाळी ११.४० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत नेरूळहून सुटणारी खारकोपरची डाउन लाइन सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.२५ पर्यंत नेरूळसाठी सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या BSU लाईन सेवा बंद राहतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.