Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्ही नगरसेवक कधी होणार? कार्यकर्त्यांचा सवाल; अडीच वर्षे प्रशासकीय राज

आम्हाला नगरसेवक म्हणून कधी संधी मिळणार? अशी चर्चा आता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. अडीच वर्षाहून अधिक कालावधी लाेटूनही महापािलकेत प्रशासकीय राज आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2024 | 01:04 PM
आम्ही नगरसेवक कधी होणार? कार्यकर्त्यांचा सवाल; अडीच वर्षे प्रशासकीय राज

आम्ही नगरसेवक कधी होणार? कार्यकर्त्यांचा सवाल; अडीच वर्षे प्रशासकीय राज

Follow Us
Follow Us:

पुणे : लाेकसभेपाठाेपाठ आता विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, खासदार झाले, आमदारही झाले, पण आम्हाला नगरसेवक म्हणून कधी संधी मिळणार? अशी चर्चा आता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. अडीच वर्षाहून अधिक कालावधी लाेटूनही महापािलकेत प्रशासकीय राज आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नागरीकांचे प्रश्न साेडविण्यात अडचणी येत आहे.

मे महीन्यात झालेल्या निवडणुकीत लाेकसभेत भाजप आणि मित्र पक्षाने बहुमत मिळविले. तर नाव्हेंबर महीन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त कमबॅक केले आहे. यापार्श्वभुमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी हाेणार याची चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला अक्षरशः लोळवले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला जेमतेम 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. महायुतीला मिळालेला हा अनपेक्षित अंदाज पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघता, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणुका जाहीर होणार ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका दिसत आहे. भाजपा बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे.

अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत कारभार

गेल्या अडीच वर्षापासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनीधींच्या मार्फत विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी होत असताना. असे असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर येणाऱ्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील ‘या’ भागात गॅस टँकर पलटी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

याचिका निकाली कधी ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक, प्रभाग रचना, प्रभाग किती सदस्यांचा असावा अशा विविध स्वरुपाचे आक्षेप घेत सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. याचिका अद्याप निकाली काढल्या गेल्या नाहीत. केंद्र आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार आल्याने आता याचिका निकाली काढल्या जाण्याची शक्यताही व्यक्त हाेऊ लागली आहे.

Web Title: Municipal corporation elections in the state are likely to be held soon nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
3

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.