Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जात आहे. भोर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा झेंडा आता नव्याने फडकवण्याची जोरदार तयारी केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2025 | 12:18 PM
Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने
Follow Us
Close
Follow Us:
  • माळेगाव नगरपंचायत या निवडणुका चुरशीच्या
  • संजय जगताप यांना शह देण्याची तयारी
  • शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाचे उमेदवार रिंगणात
Amol Torane, Baramati:  पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, भोर आणि जेजुरी या नगरपरिषदेसह बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत या निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar)  गटाने महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, भाजपने देखील राष्ट्रीय समाज पक्ष व इतर अपक्षांना बरोबर घेऊन आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उत्तरवले आहेत.

भूमिकेला सक्रिय पाठिंबा दिला:  इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाविरुद्ध दंड थोपटत कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत कृषी मत्री दत्तात्रय भरणे यांना आव्हान दिले आहे, या निवडणुकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले प्रवीण माने यांनी देखील गारटकर यांच्या भूमिकेला सक्रिय पाठिंबा दिला आहे.

कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव

संजय जगताप यांना शह देण्याची तयारी

सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजय जगताप यांनी देखील आपले वर्चस्व राखण्यासाठी जोरदार तयारी करत आता सासवड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा अडकवण्याचा निर्धार व्यक्त करत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या मातोश्री आनंदीकाकी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्याचबरोबर इतर सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या ठिकाणी विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी जगताप यांना शह देण्याची तयारी करत नगराध्यक्ष पदासाठी सचिन भोंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जेजुरी नगर परिषदेची निवडणूक देखील चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. एकंदरीत वरील सर्व नगरपरिषदेच्या निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे दिसून येत असले तरी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे शेवटच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शक्तीप्रदर्शन

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जात आहे. भोर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा झेंडा आता नव्याने फडकवण्याची जोरदार तयारी केली आहे. तर विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी देखील थोपटेंचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे ही निवडणूक देखील चुरशीची होणार आहे.

एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय

दौंड मध्ये भाजप व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या नागरी हित संरक्षण समितीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवली जात असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शरद पवार गट यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले असले तरी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक देखील लक्षवेधी होणार असून या ठिकाणी अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांच्या गटाला बरोबर घेत अजित पवार यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Web Title: Municipal council elections in pune district are tight mahayuti aghadi face off in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
1

Maharashtra Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
2

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
3

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
4

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.