नागपूर: नागपूर ऑडी कार हिट अँड रन प्रकरणातील वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे आणि सोबत बसलेल्या रोनित चिंतमवार यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. पोलिसांना मिळालेल्या वैदयकीय अहवालानुसार, अर्जुन हावरेच्या रक्ताच्या चाचणीत 100 मिली रक्तात 28 मिलीग्रॅम अल्कोहोल नोंदवण्यात आले आहे. तर रोनित चिंतमवारच्या रक्तात 25 मिलिग्रॅम अल्कोहोल आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. पण अपघतानंतर जवळपास सात तासानंतर दोघांची वैद्यकीय चाचणी झाल्यामुळे त्यांच्या रक्तातीतील अल्कोहोलचे प्रमाण कमी आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नागपूर पोलीस काय कारवाई करतात, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नियमानुसार, कोणाच्याही वैद्यकीय चाचणीत 100 मिलिलीटर अल्कोहोलचे प्रमाण 30 मिलीग्रॅम पर्यंत आढळून आल्यास संबंधित व्यक्ती दारूच्या प्रभावाखाली मानली जाते. पण अपघातानंतर जवळपास सात तासांनी दोघांच्याही रक्ताची चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे रोनित चिंतमवार आणि अर्जुन हावरे यांच्या रक्तात मद्याचे प्रमाण नियमापेक्षा कमी आढळून आले आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्य़ा हे दोघेही या प्रकरणातून सुखरूप बाहेर पडण्याची शक्यता आहेत.
हेही वाचा: पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; कोयते हवेत फिरवून हडपसरमध्ये माजवली दहशत
अपघातानंतर त्यांना ज्या रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी प्राथमिक शारीरिक तपासणीत या दोघांनीही मद्यपान केल्याचे सांगितले होते. तरीही पोलिसांनी रोनित आणि अर्जुनला तात्काळ अल्कोहोल टेस्ट करण्यासाठी का नेले नाही, सात तासांनी दोघांनाही ब्लड टेस्टसाठी का नेण्यात आले, सात तासांच्या या मधल्या वेळात नक्की काय झाले, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, सीताबर्डी पोलिसांकडून नागपूर हिट अँड रन प्रकरणाचा तपास सुरू आहे. अपघातावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगाही गाडीत होता. ही ऑडीदेखील संकेत बानवकुळेचीच होती. पण अपघातानंतर संकेत बावनकुळेची ब्लड टेस्च का झाली नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, याप्रकरणात पोलिसांवर काही राजकीय दबाव असल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. त्यातच या दोघांचीही ब्लड टेस्ट सात तासांनंतर केल्यामुळे त्यांच्या रक्तात अल्कोहोल कमी आढळून आले. पण सात तासांनंतर रक्तातील अल्कोहोलची पातळी कमी होणारच.अपघातानंतर तातडीने तिघांच्याही ब्लड टेस्ट झाल्या असत्या तर रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण चार पट जास्त आढळून आले असते, असे तज्ज्ञांकडून सांगितले सांगितले जात आहे.
हेही वाचा: PM E-Drive योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक कारवर नाही मिळणार सबसिडी, जाणून घ्या कारण