सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : हडपसरमधील साडे सतरा नळी येथे टोळक्याने कुटूंबाला शिवीगाळ करत कोयत्याने वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. इतकेच नाही तर हवेत कोयते फिरवून एका घरावर दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रात्री दत्त नगर येथे घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या वडिलांना यातील बापु मकवाना आणि प्रसाद ढगे यांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी परिसरात मोठ-मोठ्याने शिवीगाळ करत दहशत पसरवली. तक्रारदारांना शिवीगाळ केली. नंतर टेम्पोच्या काचा फोडत हातातील कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. पुढे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी खाली पाडून गोंधळ घातला. तसेच, एका घरावर दगडफेक देखील केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
औषध उधारीवर न दिल्याने चाकूने वार
हडपसरमधील खंडोबा माळ येथे एका मेडीकल व्यावसायिकाने औषध उदारीवर न दिल्याने ग्राहकाने चाकूने डोक्यात आणि हातावर वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांत मनोज सुदाम अडागळे (वय ४०) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत वैभव मखरे (वय २६) यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली आहे.पोलीस तपास करत आहेत.