Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास

Nagpur Airport Expansion: एमआयएलने मालकीची २७१ हेक्टर अतिरिक्त जमीन जीएमआरसोबतच्या करारातून पूर्णपणे वेगळी ठेवली आहे. जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात केवळ विमानसेवा आणि तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता विमानतळ परिसरातील जमिनींचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवण्याची संकल्पना वेगाने स्वीकारली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 02, 2026 | 12:49 PM
Nagpur Airport Expansion, Babasaheb Ambedkar International Airport, GMR Group Nagpur

Nagpur Airport Expansion, Babasaheb Ambedkar International Airport, GMR Group Nagpur

Follow Us
Follow Us:
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार आणि आधुनिकीकरणाची जबाबदारी जीएमआरकडे
  • नागपुरात मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याबरोबरच स्थानिकांसाठी हजारो रोजगाराच्या संधी
  • एमआयएलने मालकीची २७१ हेक्टर अतिरिक्त जमीन जीएमआरसोबतच्या करारातून पूर्णपणे वेगळी
 

Nagpur Airport Expansion: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार आणि आधुनिकीकरणाची जबाबदारी जीएमआरकडे सोपवली आहे. या प्रकल्पासाठी विमानतळाच्या कार्यान्वित क्षेत्रातील सुमारे ९०० हेक्टर आणि शहरालगतच्या १०० हेक्टरसह एकूण १,००० हेक्टर जमीन ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय विमानतळालगतची २७१ हेक्टर (सुमारे ६७० एकर) अतिरिक्त जमीन व्यावसायिक विकासासाठी वापरण्याची तयारी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ने सुरू केली आहे. (Nagpur Airport News)

अतिरिक्त जमिनीचा व्यावसायिक वापर करून महसूल मिळवण्याचे नियोजन एमआयएलने केले आहे. त्यासाठी क्षेत्राचा सांकेतिक मास्टर प्लॅन आणि व्यवहार्यता अभ्यास (फिजिबिलिटी स्टडी) तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. विस्तीर्ण जमिनीचे आर्थिक मूल्य आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन अभ्यास केला जाणार आहे. त्याआधारे दीर्घकालीन महसूल मिळवून देणारा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

हा मास्टर प्लॅन प्रत्यक्षात आल्यास नागपुरात मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याबरोबरच स्थानिकांसाठी हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १८ ते २० दिवसांत याप्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता आहे. जीएमआरला हस्तांतरित करण्यात येणाऱ्या १,००० हेक्टर जमिनीव्यतिरिक्त ही २७१ हेक्टर जमीन असल्याने या क्षेत्राचा विकास आणि व्यवस्थापन पूर्णपणे एमआयएलच्या नियंत्रणाखाली राहणार आहे.

नॉन-एरो महसुलासाठी एमआयएलचा मोठा डाव

एमआयएलने मालकीची २७१ हेक्टर अतिरिक्त जमीन जीएमआरसोबतच्या करारातून पूर्णपणे वेगळी ठेवली आहे. जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात केवळ विमानसेवा आणि तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता विमानतळ परिसरातील जमिनींचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवण्याची संकल्पना वेगाने स्वीकारली जात आहे. एमआयएलवे हैं पाऊल त्याच धोरणाचा भाग मानले जात आहे.

सल्लागार संस्था बाजारातील मागणीचा सखोल अभ्यास करून २७१ हेक्टर जमिनीचा व्यावसायिक, औद्योगिक किंवा इतर लाभदायी उपयोग कशा प्रकारे करता येईल, याचा आराखडा तयार करणार आहे. त्यामुळे ही योजना एमआयएलसाठी नॉन-एरो महसूल वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.

पडिक जमिनीतून महसूल मिळवण्याचे प्रयत्न तीव्र
जीएमआरला देण्यात येणाऱ्या १००० हेक्टर जमिनीपैकी उर्वरित जमीन एमआयएनको
१८ ते २० दिवसात प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
एमआयएलच्या भूमीद्वारे विकासाची नवीन दिशा
प्रकल्प एमआयएलच्या नियंत्रणाखाली असेल

Web Title: Nagpur dr babasaheb ambedkar airport expansion gmr mil master plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Nagpur Airport
  • Nagpur News

संबंधित बातम्या

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
1

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.