Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Protest: बच्चू कडूंचा ‘ट्रॅक्टर मार्च’ नागपुरात दाखल; मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरापर्यंत ‘हाय अलर्ट’!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मार्च नागपुरात दाखल झाला आहे. कडू यांनी सरकारवर बैठक बोलावून अटक करण्याचा गंभीर आरोप केला असून, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरात हाय अलर्ट जारी

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 28, 2025 | 09:46 PM
बच्चू कडूंचा 'ट्रॅक्टर मार्च' नागपुरात दाखल (Photo Credit - X)

बच्चू कडूंचा 'ट्रॅक्टर मार्च' नागपुरात दाखल (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • कर्जमाफीसाठी आंदोलन तीव्र
  • बैठकीऐवजी थेट निर्णय घ्या
  • कडूंचा सरकारला थेट इशारा

Bacchu Kadu Protest: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. हा ‘ट्रॅक्टर मार्च’ वर्धाहून निघून नागपूरजवळच्या बुटीबोरी येथे दाखल झाला असून, मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

“बैठक म्हणजे अटक करण्याची योजना” – बच्चू कडू

बच्चू कडू यांनी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारवर थेट आरोप केला आहे की, बैठक बोलावून त्यांना अटक करण्याची योजना आखली जात आहे. कडू म्हणाले, “बैठकीची काय गरज आहे, थेट निर्णय घ्या.” आम्ही यापूर्वी दहा वेळा बैठकीची विनंती केली, पण सरकारने प्रतिसाद दिला नाही. आता मार्च सुरू झाल्यावर बैठक बोलावणे म्हणजे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. जर आम्ही बैठकीला गेलो आणि आम्हाला अटक झाली, तर आंदोलक निराधार राहतील. हा अन्याय असेल.” कडू यांनी स्पष्ट केले की, ते आता कोणत्याही सरकारी बैठकीत सहभागी होणार नाहीत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

#WATCH | Nagpur, Maharashtra: Thousands of farmers led by Former minister and Prahar Party leader Bacchu Kadu block the Nagpur–Hyderabad National Highway (NH-44) They are demanding immediate, unconditional loan waivers for debt-ridden farmers. The protesters allege that despite… pic.twitter.com/HLSTtRbmRz — ANI (@ANI) October 28, 2025

नागपूरमध्ये ‘हाय अलर्ट’

सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नागपूरमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. नागपूरमधील धरमपेठ येथील मुख्यमंत्री निवासस्थान, सिव्हिल लाईन्स येथील सरकारी निवासस्थान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय या परिसरातील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आणि वाहतूक विभाग पूर्णपणे सज्ज आहेत.

पुण्यातील Pune Jain House Land प्रकरणात धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय; 30 ऑक्टोबर पर्यंत…

आंदोलन ‘ग्रामीण महाराष्ट्रा’चे

हा ‘ट्रॅक्टर मार्च’ वर्धाहून बुटीबोरी येथे पोहोचला आहे. यामध्ये हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलकांसाठी सोलापूरहून २०,००० भाकरी, मिरची आणि शेंगदाणा खरडा, नाशिकहून कांदे आणि भाज्या, लातूरहून तूर डाळ, तसेच इतर भागांतून हुरडा आणि धान्य नागपूरला पाठवण्यात आले आहे. यावरून संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र या आंदोलनासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारचा अल्टिमेटम समाप्त, मोर्चा नागपूरकडे

आंदोलकांनी सरकारला संध्याकाळी ५ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, तो आता समाप्त झाला आहे. त्यामुळे आता आंदोलक नागपूर शहराकडे कूच करत आहेत.

शेतकऱ्यांचे प्रमुख आरोप:

  • “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” या घोषणेवर सत्तेत आलेल्या सरकारने अद्याप कोणतीही ठोस मदत दिलेली नाही.
  • कर्जमाफी नाही, हमीभाव नाही. याउलट, केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत.
  • कापसाच्या आयातीमुळे देशांतर्गत किंमती घटल्या आहेत.
  • सोयाबीनचा किमान आधारभूत भाव (MSP) ₹५,३३५ असताना शेतकऱ्यांना ते ₹५०० ते ₹३,००० प्रति क्विंटल दराने विकावे लागत आहे.

Flood Relief: “येत्या 15 दिवसांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना…”; काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस?

Web Title: Bachchu kadus tractor march enters nagpur high alert from chief ministers residence to rss headquarters area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • CM Devendra Fadanvis
  • Farmer Protest
  • Nagpur

संबंधित बातम्या

Mumbai Climate Week 2026: मोठी घोषणा! भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘मुंबई क्लायमेट वीक’चे यजमानपद भूषवणार
1

Mumbai Climate Week 2026: मोठी घोषणा! भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘मुंबई क्लायमेट वीक’चे यजमानपद भूषवणार

Nagpur: नागपूर हादरलं! व्हिडिओ कॉलवर प्रियकराशी बोलत होती रिल स्टार पत्नी, संतापलेल्या नवऱ्याने डोक्यात फावडा मारून केली हत्या
2

Nagpur: नागपूर हादरलं! व्हिडिओ कॉलवर प्रियकराशी बोलत होती रिल स्टार पत्नी, संतापलेल्या नवऱ्याने डोक्यात फावडा मारून केली हत्या

NCP Office Dance Video: राष्ट्रवादीचे कार्यालय की तमाशाचा फड? संबंधितांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारणे दाखवा नोटीस
3

NCP Office Dance Video: राष्ट्रवादीचे कार्यालय की तमाशाचा फड? संबंधितांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारणे दाखवा नोटीस

1 खुर्ची, 2 महिला अधिकारी…! गडकरींसमोरच दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; एकीने दुसरीच्या अंगावर ओतलं पाणी; Video Viral
4

1 खुर्ची, 2 महिला अधिकारी…! गडकरींसमोरच दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; एकीने दुसरीच्या अंगावर ओतलं पाणी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.