अवैद्य सावकारी केल्याप्रकरणी वैद्य सावकारावर रबाळेत गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
१४ फेब्रुवारीला देशभरात ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब चर्चेत आहे. त्यानंतर त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज नगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवून टाकावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलनं, निर्दर्शनं केली जात आहेत. विशेष म्हणजे या मागणीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.सोमवारी रात्री नागपूरच्या महालमध्ये दोन गटांमधील वादानंतर हिंसाचार उसळला. महालनंतर रात्री उशिरा हंसपुरी परिसरातही हिंसाचार उसळला. अज्ञात लोकांनी दुकानांची तोडफोड केली आणि वाहनांना आग लावली. यादरम्यान जोरदार दगडफेक झाली. हिंसाचारानंतर अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणारे पोलिसही जखमी झाले. हिंसाचारात डीसीपी अर्चित चांडक, डीसीपी निकेतन कदम आणि डीसीपी शशिकांत सातव जखमी झाले. या तिन्ही पोलिसांवर नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डीसीपी निकेतन कदम यांच्या हाताला २० टाके पडले आहेत. त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. डीसीपी शशिकांत सातव यांना गुडघ्याला दुखापत झाली आहे. याशिवाय डीसीपी अर्चित चांडक यांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तिन्ही पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.
नागपूर हिंसाचारावर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री योगेश रामदास कदम म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, १४ पोलिस आणि ३ नागरिक जखमी झाले आहेत. आम्ही हिंसाचारामागील मूळ कारणांचा शोध घेत आहोत. ज्यांनी हे क्रूर कृत्य केले आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”
खुलदाबाद येथील औरंगजेबाच्या थडग्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली आहे. मंदिरात येणाऱ्या लोकांची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जाईल. नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर, खुलदाबादमध्ये प्रशासन खबरदारी घेत आहे.