
महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले जनतेचे आभार
भाजपचे ३ हजार पेक्षा अधिक नगरसेवक आले निवडून
Maharashtra Local Body Elections: काल राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महायुतीने घवघवीत यश प्राप्त केल्याचे पाहायला मिळाले. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे ३ हजार पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवडून आलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या सत्कार करण्यात आल्या. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपूरमध्ये २७ पैकी २२ नगरपालिका भाजपने जिंकल्या आहेत. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपल्याला निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. जनतेने आपल्या कामाची पावती दिली. भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार मानतो. महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष राज्यात निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे केवळ ५० च्या आसपास नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचा सफाया केला आहे.”
LIVE | पत्रकार परिषद 🕜 दु. १.३३ वा. | २२-१२-२०२५📍नागपूर.@BJP4Nagpur#Maharashtra #NagarParishad2025 #BJPNo1 https://t.co/muwMCrtZNL — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 22, 2025
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गाला प्रतिसाद मिळत आहे. प्रचंड मोठे बहुमत भाजपला या निवडणुकीत मिळाले आहे. महायुतील मिळाले आहे. भाजपचा राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर आपण, विरोधी पक्षांचे बालेकिल्ले पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले दिसत आहेत. सावनेरमध्ये कॉँग्रेसमुक्त नगरपालिका तयार केली आहे.”
नगरपरिषद निवडणुकांत भाजप–महायुतीचे घवघवीत यश
महायुतीला मोठा फायदा झाला. भाजपने २८८ पैकी २३६ ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. भाजपचे उमेदवार विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला वेळ, कार्यर्त्यांबरोबर त्यांनी प्रत्यक्षात जाऊन लढली. भाजपला विधासभा निवडणुकीतही जनतेने घवघवीत यश दिले. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीही विरोधक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी आणि जनतेने दुर्लक्ष केलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या ताकदीने काम करत आहे. या सगळ्याचा फायदा नागरिकांना जास्तीत जास्त कसा होईल. यासाठी महायुतीचे नेते परिश्रम घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने रोडमॅप तयार केला आहे.