Nagarparishad Election Result 2025 Live Updates,
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यंनी या निवडणुकीत मोलाचे योगदान होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात या निवडणुका पार पडल्या. मुख्यमंत्री म्हणून राज्यभरात ५० हून अधिक सभा घेतल्या. काही सभांना त्यांना जाता आले नाही. कार्यकर्ता म्हणून देवेंद्रजींनी सर्व ठिकाणी सभा घेतल्या.
महायुतीला मोठा फायदा झाला. भाजपने २८८ पैकी २३६ ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. भाजपचे उमेदवार विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला वेळ, कार्यर्त्यांबरोबर त्यांनी प्रत्यक्षात जाऊन लढली. भाजपला विधासभा निवडणुकीतही जनतेने घवघवीत यश दिले. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीही विरोधक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी आणि जनतेने दुर्लक्ष केलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या ताकदीने काम करत आहे. या सगळ्याचा फायदा नागरिकांना जास्तीत जास्त कसा होईल. यासाठी महायुतीचे नेते परिश्रम घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने रोडमॅप तयार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि १२ नगरपंचायतींचे निकाल रविवारी जाहीर झाले. १५ पैकी १२ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. उर्वरित तीनपैकी एका ठिकाणी काँग्रेस, एका ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, तर एका ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) यांना यश मिळाले. या निकालांमुळे जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व अधोरेखित झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती पाहायला मिळाल्या. मात्र बहुतांश ठिकाणी खरी चुरस भाजप आणि काँग्रेस यांच्यातच होती. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत झाली, तर काही नगरपालिकांमध्ये भाजपला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करावा लागला.
भाजपने सुरुवातीपासूनच ‘एकला चलो’ची भूमिका घेत संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यावर भर दिला होता. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल भाजपच्या याच रणनीतीला पूरक ठरले आहेत.
Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालां
नागपूरमध्ये कशी झाली निवडणूक?
१५ पैकी १२ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असून त्यामध्ये कामठी, सावनेर, उमरेड, खापा, वाडी, कळमेश्वर आदी नगरपालिकांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काटोल नगरपालिकेत अध्यक्षपद जिंकले, तर शिवसेनेने रामटेकचा गड कायम राखला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगरपालिकेत भाजपला प्रथमच यश मिळाले आहे.






