Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्यालयासाठी ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली, सेना कार्यालय शिंदे गटाला, उद्धव ठाकरे गटाची स्वतंत्र सोय

त्यात दोन महिला व चार पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शेवटी हे कर्मचारी उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या कार्यालयात आले. येथे आमदार रवींद्र वायकर यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी या कर्मचाऱ्यांचे सांत्वन केले. नंतर पत्रकारांशी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून या कर्मचाऱ्यांनी एकनाथ शिंदेसह सर्व सेना आमदारांची सर्व कामे केली.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 19, 2022 | 05:40 PM
maharashtra political crisis confused shiv sainik or leadership nrvb

maharashtra political crisis confused shiv sainik or leadership nrvb

Follow Us
Follow Us:

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरातील कार्यालयासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जुंपली. जुने कार्यालय एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यावर उद्धव ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे असलेले दुसरे कार्यालय देण्यात आले. दरम्यान, मूळ शिवसेनेच्या व नंतर शिंदे गटाला मिळालेल्या कार्यालयातून जुन्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढल्यावर या कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात सुरुवातीला शिवसेनेच्या एकाच कार्यालयात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे कार्यालय असल्याचे दृश्य दिसत होते. यावेळी एका खोलीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही चित्र लागले होते. दरम्यान, दुपारी जुने कार्यालय एकनाथ शिंदे गटाला मिळाले, तर उद्धव ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील भागातील दुसरे कार्यालय देण्यात आले. या कार्यालयातील जुने कर्मचारी दरवर्षीप्रमाणे जुन्या कार्यालयात आपले काम करत होते. नेहमीप्रमाणे यंदाही हे कर्मचारी शिवसेनेच्या कार्यालयात काम करीत होते. मात्र या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला व या कर्मचाऱ्यांनाही कार्यालयातून बाहेर काढले.

त्यात दोन महिला व चार पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शेवटी हे कर्मचारी उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या कार्यालयात आले. येथे आमदार रवींद्र वायकर यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी या कर्मचाऱ्यांचे सांत्वन केले. नंतर पत्रकारांशी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून या कर्मचाऱ्यांनी एकनाथ शिंदेसह सर्व सेना आमदारांची सर्व कामे केली. आता शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यावर त्यांना रडवून बाहेर काढणे कुणालाही शोभणारे नाही. ही मानवी वृत्ती नाही, असे वायकर म्हणाले. यावेळी त्यांनी सहाही कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय ठाकरे गटाला मिळालेल्या नवीन कार्यालयात करण्याची सूचना केली. यादरम्यान एकनाथ शिंदे गट कार्यालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र काढून तेथे आनंद दिघे यांचे छायाचित्र लावण्यात आले.

Web Title: Dispute over possession of shivsena office in nagpur assembly session main office to eknath shinde group separate office for uddhav thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2022 | 05:40 PM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party
  • Uddhav Thackeray Group

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.