Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…म्हणून महाराष्ट्र सरकारचा शपथविधी होणार 5 डिसेंबरला अन् तेही 5 वाजता

मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार की आणखी कोणी, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी शपथविधीची वेळ मात्र ठरली आहे. येत्या 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 03, 2024 | 01:27 PM
नोकरीसाठी चक्क मंत्रालयात घेतल्या बोगस मुलाखती; नागपूरच्या भामट्याने 1.60 कोटी उकळले

नोकरीसाठी चक्क मंत्रालयात घेतल्या बोगस मुलाखती; नागपूरच्या भामट्याने 1.60 कोटी उकळले

Follow Us
Follow Us:

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्यानुसार, आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. गुरुवारी (दि.5) नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. हा सोहळा सायंकाळी 5 वाजता होणार आहे. पण आता 5 तारीख आणि 5 वाजता हे समीकरण दिसत असल्याने याचीच चर्चा सुरु झाली आहे.

हेदेखील वाचा : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; एकनाथ शिंदे खातेवाटपात सकारात्मक नसतील तर त्यांना…

मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार की आणखी कोणी, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी शपथविधीची वेळ मात्र ठरली आहे. येत्या 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी तिथी दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी समाप्त होत असून, सायंकाळी 5 वाजता शुक्ल पक्षातील पंचमीचा मुहूर्त हा अत्यंत शुभ आहे. यावेळी मुंबई येथील वातावरणात शुभ ग्रह गुरुचा शुभ प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचा दावा ज्योतिषाचार्यांकडून केला आहे.

विशेष म्हणजे ज्योतिषाचार्यांनी शपथविधीच्या वेळेस वृषभ असल्यामुळे महायुती सरकार पुढील पाच वर्षे चांगल्याप्रकारे कार्य करेल, असे भाकितही केले आहे. शनि आणि राहू ग्रहांच्या भ्रमणामुळे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जन्म कुंडलीनुसार ते मुख्यमंत्र्याची शपथ घेतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच घेणार शपथ

महाराष्ट्रात या वेळेला शपथ ग्रहण सोहळा होणार आहे. शपथ ग्रहण करणाऱ्या मंत्रिमंडळातील सदस्यांना मुंबईच्या पत्रिकेमधील कर्म स्थानात असलेला व राजकारणासाठी योग्य असलेला शनि आशीर्वाद देणार आहे. मुंबई येथे शुक्र आणि चंद्र हे शुभग्रह भाग्य स्थानात राहतील, असे म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदेंना विश्रांतीचा सल्ला

दरम्यान, सोमवारी सकाळी अचानक त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या. यामुळे महायुतीतील सुरू असलेल्या संघर्षाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. मात्र, शिंदे यांची प्रकृती ठीक नसून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे त्यांच्या नेत्यांनी सांगितले. मात्र, महायुतीचा भाग असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीची यामध्ये नवी भूमिका पाहायला मिळत आहे.

शिंदे यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची खेळी

महायुतीचा भाग असलेला भाजप मोठा ‘खेला’ करण्याच्या तयारीत असल्याचीही अंतर्गत चर्चा आहे. शिंदे सरकारमध्ये सहभागी होत नसतील तर त्यांना विरोधी पक्षनेते करून मोठी खेळी खेळण्याची तयारी आहे. त्यामुळे सरकार चालवणे सोपे होईल.

हेदेखील वाचा : मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर, सावरकरांच्या वकिलांनी केली कारवाईची मागणी

Web Title: Know why swearing ceremony will be at 5 oclock nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 01:27 PM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
2

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही
3

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
4

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.