Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉंगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातील सावरकरांशी संबंधित उल्लेखांवर आक्षेप घेत शिवसेनेने पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पुस्तकातील कथित आक्षेपार्ह पाने फाडून निषेध नोंदवला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2026 | 06:46 PM
sonia-gandhi autobiography-belonging the journey of love-savarkar-controversy-shiv-sena-demand-banned book

sonia-gandhi autobiography-belonging the journey of love-savarkar-controversy-shiv-sena-demand-banned book

Follow Us
Follow Us:
  • सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी
  • पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा 
  • उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागावी – म्हात्रे
Shivsena on Sania Gandhi Book Contraversy : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या सोनिया गांधी यांच्या नुकताच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रावर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉंगिंग – अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करण्यात आलेली पाने फाडून निषेध केला. या पत्रकार परिषदेला शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शायना एन.सी. सुशीबेन शाह, संजना घाडी, संजय निरुपम आणि आनंद दुबे उपस्थित होते.

“सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ११ वर्ष अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्यावर असंख्य अत्याचार करण्यात आले. इतिहासात ज्यांचे नाव स्वातंत्र्यवीर म्हणून नोंदलं गेलं त्यांना माफीवीर अशी खालच्या पातळीची टीका राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने करतो,” असे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींना जोडे मारण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला. सोनियांचे पुस्तक स्वीकारल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागावी.’

Yogi Adityanath Golden Earrings : योगी आदित्यनाथ कानात सोन्याची कुंडलं का घालतात? जाणून घ्या धार्मिक परंपरा अन् किंमत

“‘बिलॉंगिंग – अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील पान क्रमांक २०१ वर सोनिया गांधी यांनी सावरकर सातत्याने ब्रिटीश सरकारकडे शिक्षा कमी करण्यासाठी माफीची पत्रे लिहित होते, असा उल्लेख केला आहे. तसेच पान क्रमांक ४४३ वर सावरकरांनी गांधीजींच्या भारताविषयीच्या संकल्पनेविरोधी भूमिका घेतली, असा उल्लेख केला. या पुस्तकाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष, संघ परिवार यांच्याबद्दल एक फेक नरेटिव्ह मांडल्याची टीका शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी केली. सोनिया गांधी यांचे पुस्तक हे जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद आहे, अशी टीका त्यांनी केली. या पुस्तकातून सोनिया गांधी यांनी मराठी साहित्यिकाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान केलाय,” असे त्या म्हणाल्या.

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”

त्या पुढे म्हणाल्या की, “काश्मिरातील जमीन पाकिस्तानने जेव्हा गिळली, राजीव गांधीजींच्या काळात शिखांच्या दंगली झाल्या. बोफोर्स घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, यूपीएच्या काळात वाढलेला दहशतवाद, मुंबईवरील २६/११ चा हल्ला, यासाठी सोनियांनी माफी का मागितली नाही,” असा सवाल घाडी यांनी केला. “बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे हे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत दाखवतील का,” असा खरमरीत सवाल घाडी यांनी केला. “सावरकरांचा अपमान करणाऱ्या सोनिया यांनी इटलीला परत जावे,” असा खोचक टोला घाडी यांनी लगावला.

संजय निरुपम यांनीही यावेळी सावरकरांचा वारंवार करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “सोनिया गांधी यांनी संसदेतील सावरकरांच्या तैलचित्राच्या स्थापनेला विरोध करणारे पत्र राष्ट्रपतींना दिले होते. सोनिया गांधी या पुस्तकात प्रेमाबद्दल बोलतात मात्र प्रत्यक्षात त्यांच्या मनात हिंदू धर्म आणि हिंदू नेत्यांविषयी द्वेष आहे, अशी टीका निरुपम यांनी केली. सोनिया यांच्या आत्मचरित्रावर बंदी घालावी,” अशी मागणी निरुपम यांनी केली.

Web Title: Sonia gandhi autobiography belonging the journey of love savarkar controversy shiv sena demand banned book nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Congress
  • political news
  • Sanjay Nirupam
  • Sonia Gandhi
  • Swatantra Veer Savarkar

संबंधित बातम्या

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”
1

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान
2

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो
3

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो

Satej Patil : गोकुळ गाजवलं, आता गोव्याची जबाबदारी! बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठं गिफ्ट, राष्ट्रीय राजकारणात दमदार एन्ट्री?
4

Satej Patil : गोकुळ गाजवलं, आता गोव्याची जबाबदारी! बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठं गिफ्ट, राष्ट्रीय राजकारणात दमदार एन्ट्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.