Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ; शाळांसमोर पोलिसांचा तळ, युद्धपातळीवर तपास

Nagpur Bomb Threat : नागपुरातील काही शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शाळांसमोर कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकांकडून शाळा आणि परिसराची तपासणी करण्यात येत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 01, 2026 | 02:23 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • अचानक सुट्टी पालकांची धावपळ
  • घाबरू नका सतर्क रहा
  • याआधीही मेल आला होता
Nagpur Bomb Threat : शहरातील १६ शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह १९ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संबंधित शाळांसमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यासोबतच सघन शोधमोहीम राबविण्यात आली.

काही शाळांमध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली. मात्र, कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांसह शाळा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. ३१ ऑगस्ट रोजी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित शाळांमध्ये विशेष खबरदारी घेतली. शाळांच्या परिसरासह वर्गखोल्या, आवार आणि आजूबाजूच्या परिसराची पोलिस अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासणी केली.

Nagpur Crime : गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण

याआधीही मेल आला होता

यापूर्वी १८ ऑगस्ट रोजीही शहरातील शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ई-मेल पाठविण्यात आले होते. आभासी खासगी जाळ्याचा (व्हीपीएन) वापर करून पॅरिस आणि बांगलादेशातून हे ई-मेल पाठविण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे सोमवारी पुन्हा धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी कोणताही धोका पत्करला नाही.

Nagpur News : नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क

अचानक सुट्टी पालकांची धावपळ

सोमवारी सकाळी शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाल्या होत्या. मात्र, धमकीची माहिती समोर आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काही शाळांनी सकाळी ९ ते १० वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांना अचानक सुट्टी जाहीर केली. पालकांना संदेश पाठवून मुलांना शाळेतून घेऊन जाण्यास सांगण्यात आले.

अनेक पालक कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांना तातडीने व्यवस्था करून शाळेत धाव घ्यावी लागली, दरम्यान, शाळेच्या बस आणि वाहनचालकांपर्यंत सुट्टीची माहिती वेळेत न पोहोचल्याने काही विद्यार्थी पालक येईपर्यंत शाळेतच ताटकळले होते.

Nagpur News : २६ वर्षांचा वनवास; रिंगरोडसाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई कधी?

घाबरू नका सतर्क रहा

३१ ऑगस्टच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवार रात्रीपासूनच संबंधित शाळांच्या परिसरातील गस्त वाढविली होती, स्थानिक पोलिस ठाण्यांना शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात नियमित गस्त घालण्यासह संशयास्पद व्यक्तींची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रात्रीच्या वेळी शाळांसमोर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. शाळा किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी ती हाताळू नये, तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Nagpur bomb threat bomb threat sparks panic police deployed outside schools investigation underway on a war footing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Nagpur News
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Nagpur Airport : १.५० लाख टनांचे लक्ष्य गाठणार कसे? कार्गो घटल्याने जीएमआरच्या योजनेसमोर मोठे आव्हान
1

Nagpur Airport : १.५० लाख टनांचे लक्ष्य गाठणार कसे? कार्गो घटल्याने जीएमआरच्या योजनेसमोर मोठे आव्हान

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क
2

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क

Nagpur News : २६ वर्षांचा वनवास; रिंगरोडसाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई कधी?
3

Nagpur News : २६ वर्षांचा वनवास; रिंगरोडसाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई कधी?

Nagpur Crime :गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण
4

Nagpur Crime :गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.