
फोटो सौजन्य AI
सणापूर्वी बाजारपेठांमध्ये वाढलेल्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होते. दसरा जवळ येत असल्याने बाजारपेठांमध्ये सणाच्या तयारीला वेग आला आहे. घरासाठी नवीन वस्तु, वाहने, सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासोबतच मालमत्तेत गुंतवणूक करण्याकडेही नागरिकांचा कल दिसून आला. रविवारची सुटी असल्याने नोकरदार आणि कुटुंबांना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळाला.
श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची चांगली वर्दळ आहे. सुटीचा लाभ घेत नागरिकांनी खरेदीला पसंती दिली. दूरचित्रवाणी संच, फ्रिज, वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्रे, स्मार्टफोन आणि अन्य घरगुती उपकरणांच्या खरेदीत ग्राहकांनी रस दाखविला. आकर्षक सवलती, सुलभ अर्थसाहाय्य आणि विविध उत्पादनांवरील ऑफर्समुळे ग्राहकांची गर्दी वाढली.
Nagpur News : भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
८ बटुकभाई सन्सचे संचालक किशोर सेठ यांनी सांगितले की, सोन्याच्या वाढलेल्या किमतींचा खरेदीदारांवर फारसा परिणाम झालेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोने-चांदीच्या खरेदीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. दसऱ्यापूर्वी सराफा शोरूममध्येही ग्राहकांची चांगली वर्दळ दिसून आली. नागरिकांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह पारंपरिक आणि आधुनिक डिझाइनच्या दागिन्यांची पाहणी करून खरेदीला पसंती दिली.
Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन
नांगिया मोटर्सचे संचालक अक्षत नांगिया यांनी सांगितले की, दसरा हा वाहन खरेदीसाठी शुभ मानला जातो, त्यामुळे रविवारी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ होती. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची माहिती घेणे, नवीन मॉडेल पाहणे तसेच वाहनांचे आरक्षण करण्यासाठी ग्राहक शोरूममध्ये दाखल झाले, वाहन कंपन्या आणि विक्रेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलती, अर्थसाहाय्याच्या सुविधा आणि अन्य लाभांमुळे ग्राहकांची रुची वाढली,