
फोटो सौजन्य सोशल मीडिया
वाहन चोरीविरोधी पथकाने कारवाई करत चारही ट्रक जप्त केले असून, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाईत पारले जी बिस्किटे, तांदळाची २१० पोती आणि चार ट्रक असा एकूण ५५ लाख १० हजार १७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आयशर कंपनीच्या एका ट्रकला एमएच ४० सीटी ८६८३ हा अधिकृत क्रमांक देण्यात आला होता. याच क्रमांकाच्या बनावट नंबरप्लेट तयार करून त्या अन्य तीन ट्रकवर लावण्यात आल्या. वाहनांचे कर्ज आणि हप्ते थकीत असल्याने बँका तसेच फायनान्स कंपन्यांकडून होणारी जप्ती टाळण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. जप्त वाहनांमध्ये दोन आयशर प्रो-१११०, एक टाटा ११०९ आणि एक आयशर प्रो-२११० ट्रकचा समावेश आहे.
Nagpur News : चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
कळमना मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये एकाच क्रमांकाच्या नंबरप्लेट असलेले चार ट्रक उभे असल्याची माहिती वाहन चोरीविरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२.५० ते पहाटे २.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी पार्किंगवर छापा टाकला. तपासणीदरम्यान चारही ट्रकवर एमएच ४० सीटी ८६८३ क्रमांक आढळला.
त्यापैकी एका ट्रकचा क्रमांक अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले, तर उर्वरित तीन ट्रकवर त्याच क्रमांकाच्या बनावट नंबरप्लेट लावल्याचे उघड झाले. या प्रकरणी राजेंद्रसिंग सतनामसिंग रंधावा (५१) आणि सुखदेवसिंग राजेंद्रसिंग रंधावा (२४) यांना अटक करण्यात आली आहे. शिवासिंग लक्ष्मण जाधव हा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी चारही ट्रक ताब्यात घेतल्यानंतर त्यातील मालाचीही तपासणी केली. एका ट्रकमध्ये पारले जी बिस्किटे तसेच तांदळाची २१० पोती आढळून आली. वाहने आणि माल असा एकूण ५५ लाख १० हजार १७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला