Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात 4 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत DJ, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा संभाव्य प्रश्न लक्षात घेऊन नागपूर शहरात DJ आणि लेझर लाईटच्या वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2026 | 04:01 PM
गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

Follow Us
Follow Us:
  • DJचा आवाज बंद!
  • विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
  • 1 नोव्हेंबरपर्यंत कडक बंदी
Ganeshotsav 2026: पुण्यात गणेशोत्सवात DJच्या वापरावरून वाद तापलेला असतानाच नागपूरमध्ये पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आगामी सण-उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषण, लेझर आणि बीम लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका तसेच कायदा-सुव्यवस्थेचा संभाव्य प्रश्न लक्षात घेऊन नागपूर शहरात DJ आणि लेझर लाईटच्या वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

1 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध

नागपूर शहरात 4 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत विविध सण, उत्सव आणि मिरवणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सार्वजनिक तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये DJच्या वापरासह DJ साऊंड सिस्टीम वाहून नेणारी वाहने, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध असणार आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

गणेशोत्सवासह अनेक सणांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

या कालावधीत नागपूर शहरात गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबा छब्बीसवी, गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन यासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या उत्सवांमध्ये विशेषतः आगमन आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान मोठ्या क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांसह बीम आणि लेझर लाईटचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी विचारात घेतली आहे.

लेझर लाईटमुळे डोळ्यांना धोका

तीव्र बीम आणि लेझर लाईट थेट डोळ्यांवर पडल्यास इजा होण्याची शक्यता असते. गर्दीच्या मिरवणुकांमध्ये अशा लाईटचा वापर झाल्यास रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा दुर्घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

ध्वनीप्रदूषणालाही बसणार लगाम

DJच्या मोठ्या आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि रुग्णालयांच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आगामी उत्सवांदरम्यान उत्साह कायम ठेवतानाच नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यावर नागपूर पोलिसांचा भर असणार आहे.

नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई

प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे, मिरवणूक आयोजक आणि खासगी कार्यक्रमांच्या आयोजकांनाही नियमांचे पालन करावे लागणार आहे. पुण्यात DJच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वाद सुरू असतानाच नागपूर पोलिसांनी घेतलेला हा निर्णय चर्चेत आला आहे. आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

Web Title: Nagpur dj ban till november 1 vishwas nangare patil laser light ban festivals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Nagpur

संबंधित बातम्या

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
1

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

Nagpur : महिंद्राचा नागपुरात १,५०० एकरवर ग्रीनफिल्ड प्रकल्प, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार
3

Nagpur : महिंद्राचा नागपुरात १,५०० एकरवर ग्रीनफिल्ड प्रकल्प, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण
4

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.