Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स

Nagpur News : नागपुरातील वांजरा ले-आउट येथील 'मे. रूपम फूड' कारखान्यावर एफडीएने छापा टाकून १५ हजार ८२ किलो संशयित नूडल्स आणि मैद्याचा साठा जप्त केला. ७.२६ लाख रुपयांच्या या मालाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 30, 2026 | 03:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पॅकेजिंग आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी
  • १५ हजार किलोपेक्षा अधिक माल सील
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
Nagpur News : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. नागपुरातील वांजरा ले-आउट परिसरात सुरू असलेल्या एका नूडल्स उत्पादन कारखान्यावर एफडीएच्या विशेष पथकाने अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली.

या कारवाईत तब्बल १५ टनांहून अधिक संशयित नूडल्स आणि मैद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ७ लाख २६ हजार १४७ रुपये असल्याची माहिती आहे.

पॅकेजिंग आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी

वांजरा ले-आउट येथील ‘मे. रूपम फूड’ या उत्पादन कारखान्यात एफडीएचे पथक अचानक दाखल झाले. त्यावेळी कारखान्यात मोठ्या प्रमाणावर नूडल्स तयार करणे, प्रक्रिया करणे आणि पॅकेजिंगचे काम सुरू होते. तपासणीदरम्यान पथकाला उत्पादनाच्या गुणवत्तेसह पॅकेजिंगमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या.

विशेषतः चुकीचे लेबल लावलेले ‘वेज हक्का नूडल्स‘, मोठ्या प्रमाणात खुले नूडल्स आणि संशयित दर्जाचा मैदा कारखान्यात आढळला. खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर योग्य माहिती नसणे आणि दिशाभूल करणारे लेबल लावणे यासारख्या बाबी तपासणीत समोर आल्या.

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

१५ हजार किलोपेक्षा अधिक माल सील

एफडीएच्या पथकाने कारखान्यातून एकूण १५ हजार ८२ किलो संशयित नूडल्स आणि मैद्याचा साठा जप्त केला. या मालाची किंमत ७,२६,१४७ रुपये इतकी आहे. जप्त करण्यात आलेला संपूर्ण साठा सील करण्यात आला असून, त्याचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कारखान्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, शहराच्या सीमावर्ती वांजरा परिसरात अशा प्रकारचे अवैध उत्पादन युनिट मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे.

Nagpur MLC Election 2026: RSS-भाजपच्या बालेकिल्ल्यात पंजाचा तडाखा; अभिजित वंजारींनी राखला नागपूर पदवीधरचा गड

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

एफडीए आयुक्तांच्या विशेष निर्देशानुसार ही छापेमारी अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. सहआयुक्त (अन्न) कृष्णा जयपुरकर आणि सहायक आयुक्त अजय सदार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. ए. एन. खांडारे व त्यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nagpur fda raid 15 tonnes suspected noodles maida seized wanjara layout cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Food Safety
  • Marathi News
  • Nagpur News
  • noodles recipe

संबंधित बातम्या

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त
1

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास
2

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध
3

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध

Maggi Manchurian Recipe: मॅगी खाण्याचा नवा फंडा! मंचूरियन स्टाइलमध्ये बनवा झणझणीत पदार्थ, रेसिपी पाहाच
4

Maggi Manchurian Recipe: मॅगी खाण्याचा नवा फंडा! मंचूरियन स्टाइलमध्ये बनवा झणझणीत पदार्थ, रेसिपी पाहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.