Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

Nagpur News : नागपुरातील मेहबूबपुरा परिसरात पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने मध्यरात्री छापा टाकून ९ लाख ३७ हजार ९५१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. दोन स्वतंत्र ठिकाणी हा साठा आढळला असून शहरातील पानठेल्यांना पुरवठा होत असल्याच्या संशयातून पोलिस तपास करीत आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 30, 2026 | 04:04 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दोन स्वतंत्र ठिकाणी साठवणूक
  • शहरातील पानठेल्यांपर्यंत पुरवठ्याचा संशय
  • यशोधरानगर पोलिसांकडे पुढील तपास
Nagpur News : शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री आणि पुरवठा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करीत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला. यामध्ये तब्बल ९ लाख ३७ हजार ९५१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहबूबपुरा परिसरात मध्यरात्री १.३५ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

दोन स्वतंत्र ठिकाणी साठवणूक

टिपू सुलतान चौकातील नूरी मशिदीजवळ प्लॉट क्रमांक ८९९ येथे दोन स्वतंत्र ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी फैम अन्सारी (४०, रा. मेहबूबपुरा) हा तेथे आढळून आला. पंचांसमक्ष घराच्या पहिल्या मजल्यावरील गच्चीवर असलेल्या पत्र्याच्या शेडखालील खोलीची झडती घेण्यात आली. त्यात प्रतिबंधित गुटखा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळला.

यानंतर पोलिसांनी फैमचा भाऊ नदीम ऊर्फ लखन नबी अहमद अन्सारी (३८) याच्या भाड्याच्या घरालगत असलेल्या दुसऱ्या खोलीचीही तपासणी केली. तेथे देखील प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला आढळून आला. दोन्ही ठिकाणांहून जप्त केलेल्या मालाची किंमत ९ लाख ३७ हजार ९५१ रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स

शहरातील पानठेल्यांपर्यंत पुरवठ्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत फैमने जप्त केलेला साठा त्याचा भाऊ नदीम ऊर्फ लखन याच्या मालकीचा असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. दोघे भाऊ मिळून शहरातील विविध पानठेल्यांवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा गुप्तपणे पुरवठा करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. हा साठा नेमका कुठून आणला जात होता, त्याची विक्री कोणामार्फत केली जात होती आणि शहरातील किती पानठेल्यांपर्यंत त्याचे जाळे पसरले आहे, याचा तपास सुरू आहे.

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

यशोधरानगर पोलिसांकडे पुढील तपास

पोलिस उपनिरीक्षक सदाशिव कानसे यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि संबंधित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मूळ पुरवठादार शोधण्याबरोबरच या अवैध व्यवसायामागील संपूर्ण साखळी उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Web Title: Nagpur police raid mehboobpura gutkha seizure 9 lakh cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Gutkha seized
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Vaishali Kadam Reveals: मुलीला घेऊन घर सोडण्याची वेळ आली, मुलगा मात्र शांतपणे पाहत राहिला; अरुण कदम यांच्या पत्नीचा खुलासा
1

Vaishali Kadam Reveals: मुलीला घेऊन घर सोडण्याची वेळ आली, मुलगा मात्र शांतपणे पाहत राहिला; अरुण कदम यांच्या पत्नीचा खुलासा

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स
2

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास
3

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध
4

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.