Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, या निर्णयामुळे संबंधित भागातील शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 27, 2026 | 03:34 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • कापूस ,सोयाबीनचे उत्पादन घटणार
  • जिल्ह्याधिकाऱ्यांडून तातडीने पंचनामे
  • विविध उपाय योजना सुरु
Nagpur News : खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट आणि अन्य घटकांमुळे पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांमध्ये ट्रीगर-१ (प्रथम कळ) लागू झाली आहे. दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार संबंधित तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत.

राज्यातील एकूण २६५ तालुक्यांचा समावेश आहे. यात नागपूर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांसह पूर्व विदर्भातील ३९ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत.जिल्ह्यातील नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड आणि नागपूर शहर यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट आणि आष्टी यांचा समावेश आहे.

भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी आणि लाखांदूर तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा या तालुक्यात प्रथम कळ लागू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभुर्णा यांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि चामोर्शी या दोन तालुक्यांमध्येही ट्रीगर-१ लागू झाली आहे. शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे.

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

कापूस ,सोयाबीनचे उत्पादन घटणार

ट्रिगर-१ म्हणजे पावसाच्या सरासरीवर आधारित दुष्काळ सरकारने जाहीर केला असला तरी, पंचनामे पूर्ण न झाल्याने नेमक्या किती हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागपूरसह विभागात धानाला मोठा फटका बसला आहे. कापूस आणि सोयाबीनचे उत्पादनही घटणार आहे.

जिल्ह्याधिकाऱ्यांडून तातडीने पंचनामे

ट्रीगर-१ लागू झालेल्या राज्यातील तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करायचा आहे.

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

विविध उपाय योजना सुरु

शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागांसाठी जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सूट आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा सवलती लागू केल्या आहेत. तसेच सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Nagpur news 14 talukas of the district have been declared drought affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • drought news
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
1

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
2

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
3

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Maharashtra Drought : महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट? एल निनोच्या प्रभावावर फडणवीसांनी सांगितलं पुढचं चित्र
4

Maharashtra Drought : महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट? एल निनोच्या प्रभावावर फडणवीसांनी सांगितलं पुढचं चित्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.