Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरमध्ये पोलिसांनी विशेष बंदोबस्त आणि वाहतूक नियोजन केले आहे. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान शहरातील काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार असून, नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 18, 2026 | 03:32 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अनुयायांसाठी ११ ठिकाणी पार्किंग
  • वाहतुकीत केलेले बदल
  • कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरांतही निर्बंध
Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे लाखो बौद्ध अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. दीक्षाभूमी परिसरातील अनेक प्रमुख मार्गावर १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध राहतील.

तर ड्रॅगन पॅलेस परिसरात १९ ते २२ ऑक्टोबरदरम्यान वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
दीक्षाभूमी परिसरातील मार्ग बंद, काचीपुरा चौक ते माताकचेरी चौक, काचीपुरा चौक ते रामदासपेठेतील कल्पना बिल्डिंग टी-पॉइंट, माताकचेरी चौक ते कृपलानी टर्निंग, माताकचेरी चौक ते नीरी रोड टी-पॉइंट तसेच माताकचेरी चौक ते लक्ष्मीनगर चौक या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीला प्रतिबंध असेल, काचीपुरा चौक ते बजाजनगर चौक हा मार्ग शहर व एसटी बससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

अनुयायांसाठी ११ ठिकाणी पार्किंग

अनुयायांच्या वाहनांसाठी धरमपेठ सायन्स कॉलेज, राणी लक्ष्मीबाई सभागृह, तारकुंडे धरमपेठ हायस्कूलचे मैदान, धरमपेठ कॉलेजचे मैदान, बजाजनगर व्हॉलीबॉल मैदान, मॉडर्न हायस्कूल (नीरी), लक्ष्मीनगर झोन कार्यालय, एलएडी कॉलेज, कृपलानी चौक ते अजनी रेल्वे पूलदरम्यानचा नवीन विकास आराखडा रस्ता, मूक-बधिर विद्यालय (शंकरनगर चौक) आणि इंदिरा गांधी रुग्णालयामागील महापालिकेचे मैदान येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दीक्षाभूमी परिसरातील रहिवासी तसेच कार्यालयात जाणा-या नागरिकांना आवश्यक प्रवेश पास वर्धा रोडवरील सोनेगाव वाहतूक परिमंडळाच्या पोलिस निरीक्षकांकडून किंवा सोनेगाव पोलिस ठाण्यातून मिळू शकतील. परिस्थितीनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे अधिकार बंदोबस्तावरील वाहतूक पोलिस अधिका-यांना देण्यात आले आहेत.

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

वाहतुकीत केलेले बदल

जनता चौकातून काचीपुरा चौकमार्गे बजाजनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पंचशील चौक, झाशी राणी चौक, लायब्ररी चौक व अलंकार चौक या मार्गाचा वापर करावा, पर्यायी मार्ग म्हणून जनता चौक, कल्पना बिल्डिंग टी-पॉइंट, लायब्ररी चौक, अलंकार चौक व शंकरनगर चौक या मार्गानेही जाता येईल.

वर्धा रोडवरून कृपलानी टर्निंग व माताकचेरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी अजनी मेट्रो स्थानकावरून डावीकडे वळून आरपीटीएस मार्गाचा वापर करावा.

जनता चौकातून कृपलानी टर्निगमार्गे माताकचेरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वर्धा रोड, अजनी पूल चौक, हिंदुस्तान कॉलनी चौक, यू-टर्न व अजनी मेट्रो स्थानकावरून आरपीटीएस मार्गाने जावे.

अलंकार टॉकीज चौकातून काचीपुरा चौकाकडे जाणारी वाहने नॉर्थ अंबाझरी मार्ग, शंकरनगर चौक, विद्यापीठ लायब्ररी चौक व झाशी राणी चौकमार्गे वळवण्यात येतील..

लक्ष्मीनगर चौकातून माताकचेरी चौकाकडे जाणा-यांनी आठ रस्ता चौकाचा, तर नीरी टी-पॉइंटवरून माताकचेरी चौकाकडे जाणाऱ्याऱ्यांनी आरपीटीएस व अजनी चौकाचा वापर करावा.

बजाजनगर चौकातून लक्ष्मीनगर चौकाकडे जाणा-या वाहनांना व्हीएनआयटी चौक व अभ्यंकरनगरमार्ग जावे लागेल.

Nagpur News : यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरांतही निर्बंध

कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये येणाऱ्या अनुयायांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन १९ ते २२ ऑक्टोबरदरम्यान पोरवाल कॉलेज रोडवरील वाय-पॉइंट ते भोयर कॉलेज टी-पॉइंटदरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिबंध असेल, कुंभारे कॉलनी, आझादनगर, लुंबिनीनगर व छत्रपतीनगर परिसरातील रहिवाशांसह या मार्गाने ये-जा करणा-या वाहनचालकांनी घोरपड टी-पॉइंट, शासकीय आयटीआय कॉलेज व रामनगर उड्डाणपुलामार्गे जयस्तंभ चौकाकडे जावे, पर्यायी मार्ग म्हणून जुनी सुरंग पुलिया, जेपन रोड, नवीन भूमिगत सुरंग, अजनी व गादा गावमार्गे नीरी पुलियापर्यंत जाता येईल.

तेथून उजवीकडे वळून हैदराबाद महामार्गावर जावे. लिहिगाव पुलियाखालील मार्गाने घोरपड रोड व घोरपड टी-पॉइंट गाठून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाता येईल, तेथून उजवीकडे वळून छत्रपतीनगर, रविदासनगर, कुंभारे कॉलनी व आझादनगरकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसाव्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Nagpur news nagpur geared up for dhamma chakra pravartan din special traffic arrangements in place for five days cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Nagpur Police Department

संबंधित बातम्या

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला
1

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
2

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?
3

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला
4

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.