
फोटो सौजन्य सोशल मीडिया
या पुरस्काराबद्दल दिव्याची आई डॉ. नम्रता देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे. दिव्याची मोठी उपलब्धी व आतापर्यंतच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी देशाला गौरव मिळवून देत असल्याचा सर्वाधिक आनंद असल्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.
Nagpur News : बोगस डॉक्टारांविरोधात मनपाची धडक मोहीम !विशेष पथके सक्रिय
अर्जुन पुरस्कार मिळणे हा कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. दिव्याला जागतिक स्तरावर नागपूरची कन्या म्हणून ओळखले जाते, ही त्यांच्यासाठी सर्वांत मोठी गोष्ट आहे. राज्याचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कारानंतर लगेचच अर्जुन पुरस्कारासाठी निवड होणारी ती नागपूरची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार मिळाल्याने नागपूर शहराची मान आणखी उंचावली आहे. अवघ्या २० व्या वर्षी तिने मिळविलेले हे यश शहरातील इतर खेळाडूंसाठी विशेषतः उदयोन्मुख क्रीडापटूंसाठी नक्कीच प्रेरणा देणार आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन.
– डॉ. पीयूष अंबुलकर, क्रीडा अधिकारी, मनपा
| नाव | प्रकार |
|---|---|
| नीता दडवे | कबड्डी |
| विजय मुनीश्वर | अॅथलेटिक्स, पॉवरलिफ्टिंग |
| जोगिंदरसिंग बेदी | अॅथलेटिक्स |
| ओजस देवतळे | आर्चरी |
| दिव्या देशमुख | बुद्धिबळ |